Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४४७ ]
श्रीशंकर
श्रीशंकरें श्रीशंकराचार्य नामक अवतार धारण केलें त्याचें प्रयोजन पृथ्वीवर बौत्धादि नाना मतें प्रबळ होऊन वेदमार्गोच्छेद जाहाला तंनिमित्त ब्राह्मणास बहुत उपद्रव झाला. तें पाहून नारदमुनी ब्रह्मदेवाप्रत जावून सकल वृत्त निवेदन केलें. तेव्हां नारदसहीत ब्रह्मदेव कैलासाप्रति जावून श्रीशंकराची प्रार्थना केली. आपण अवतार धरून वेदमार्ग संरक्षण करून सकल जगत् कल्याण करावें असें ब्रह्मदेवप्रार्थनावचनश्रवणें दयावंत होवून श्रीशंकरे अवतार धरिला. चिदंबर क्षेत्रीं सर्वज्ञ नामा ब्राह्मण, त्याची स्त्री कामाक्षी बायी, या उभयतांनी आकाशलिंग चिदंबरेश्वराचें बहूत आराधन केलें. अनंतर चिदंबरेश्वरप्रसादें त्यास विशिष्टा नामक कन्या उत्पन्न झाली. ती विश्वजित नामा ब्राह्मण द्रविड यास स्वगृह्योक्त विवाहविधीनें दिल्ही. तदनंतर तिचा पती वेदांतदृढाभ्यासेंकरून निष्प्रपंच होवून ध्यानधारणदृढीकरणार्थ विजन अरण्याप्रति गेला. विशिष्टा पायी चिरकाळ निरंतर चिदंबरेश्वराची आराधना करीत असतां कांहीं दिवशीं भाग्योदयकाल प्राप्त होऊन ईश्वरसंनिधि देवालयीं श्रोत्रिय ब्रह्मवृंदसमक्ष श्रीईश्वरानीं बायीचे वदनकमळीं तेजःपुंज रूप प्रवेश केला. त्या दिवसापासून गर्भवती झाली. मग तत्तत्कालोचित संस्कार यथाशास्त्र यथाक्रम समस्तब्रह्मवृंद मिळोन चिदंबरेश्वर यजमान कल्पोन संपादिते झाले. नवमास संपूर्ण झालेनंतर दशम मासीं श्रीचिदंबरेश्वर श्रीशंकराचार्य नामें बायीच्या उदरीं अवतरले. तेसमयीं युधिष्ठिर शके २७२३ सर्वधारी नाम संवत्सर होतें. त्याकाळी आकाशमार्ग सर्व देवादिकांनीं दुंदुभिघोषयुक्त पुष्पवृष्टि वर्षविली. येणेप्रमाणें श्रीआचार्यस्वामीचा अवतार होवून बौद्धादिवेदविरुध नानामतनिरासपूर्वक सरस्वतीसह मंडनमिस्त्रासहि शास्त्रविवाद पराजित करून मिश्रास सुरेश्वराचार्य भारती नामक योगपट्ट देवून सरस्वतीस्थापनार्थ शृंगेरी क्षेत्रास श्रीसह गमन होवून सरस्वतीस्थापनापूर्वक षण्मत स्थापन करिते झाले. षण्मतनामधेये शिव शक्ति विष्णु गणपति सूर्य भैरव ऐशीं षण्मतें स्थापना करून चार शिष्य त्रोटकाचार्य हस्तामलकाचार्य विश्वरूपाचार्य पादपद्माचार्य ऐसे चहुं देशी चार मठ करून पूर्वोक्त चवघांचे स्थापना करिते झाले. स्वनामेकरून शृंगेरी मठ स्थापून किंचित्काल वास्तव्य करून सरस्वती वचन सत्य करावयास्तव श्री करवीर क्षेत्र दक्षिणकाशीस आगमन होवून श्रीमहालक्ष्मीचें दर्शन होवून श्रीकरवीरींही दक्षिण काशी महाक्षेत्र ह्मणोन स्वीय मठ करावा ह्मणोन शिष्यास आज्ञा करून शिष्यवचन घेवून तदनंतरें विमळ निर्मळ क्षेत्रास जावून समाधिस्त होवून अवतार समाप्त करिते जाहले. आचार्यस्थापित शिष्यपरंपरा कांही दिवस चालत आलेनंतर श्रृंगेरीमठस्त श्रीविद्यानृसिंहभारती स्वामी यांस महायात्रेस जावें ऐशी उत्कंठा झाली. त्यासमयीं श्री आचार्य स्वामीनेमित धर्मस्थापना होवून श्री व्यासदत्त चंद्रमौळेश्वराचें आराधना यथाशास्त्र चालिलें पाहिजे. यास्तव श्री विद्याशंकरभारती या नामेंकरून मठीं शिष्यस्थापना करून यात्रोद्देशीं गमन करिते झाले. कांहीं काळ काशीवास भागीरथीस्नान तपश्चिर्यादिक होवून शृंगेरी स्वीयमठास परावृत्त झाले. ऐसें असतां स्वीयस्थापित शिष्यास लोभपूर्वक मोह उत्पन्न होवून भवत्स्थापित शिष्य मी असतां आपण संस्थानचा लोभ करूं नये ऐसे शिष्योत्तर श्रवण करून अस्मदीय शिष्य आहेसें जाणून उपेक्षा करून संस्थानदेवतेचें आगमन, कुडलगीस आले. तेथेंही संस्थानसंप्रदायानरूप शिष्यपरंपरा चालत आली. कांही दिवसांनी रोजा अत्यंत प्रियशिष्य अति आदरेंकरून करवीर क्षेत्र दक्षिण काशी येथें यावें ह्मणोन अति भक्तिपूर्वक कुडलगीस्थ वृद्ध स्वामि शिष्य यांसि करवीरास घेवून आला आणि धर्मकृत्य चालवून संस्थानधर्म चालविला. कुडलगीहून करवीर क्षेत्रास आगमनसमयीं श्रीगुरूस धर्मव्ययार्थ द्रव्य पाठवून देतों ह्मणून विनंती करून करवीरास आगमन झालें. पश्चात् कांही दिवसानें कुडलगीहून श्रीगुरु स्वामींनी करवीरास आज्ञापत्र प्रेषिलें. अत्मच्छरीरीं बहुत अस्वास्थ प्राप्त झालें आहे तर तुह्मी सत्वर पत्रदर्शनी निघून यावें. तुह्मांस आगमनविलंभ असल्यास पत्र देवून पाठविला ब्राह्मण यासच चतुर्थाश्रम देऊन अत्रत्य धर्मसंरक्षणार्थ पाठवावें ह्मणोन आज्ञापत्र आलें. त्याजवरून त्या ब्राह्मणांस आश्रम देऊन कुडलगीस पाठवून दिल्हे. ते हरिहरक्षेत्रीं तुंगभद्रातीरी प्रविष्ट झाले. इतक्यांत दैवयोगेकरून कुडलगत होते श्रीस्वामी समाधिस्त झाले ह्मणोन ब्राह्मण वर्तमान घेवून श्रीस्वामीस विदित केलें कीं स्वामी समाधिस्त झाले. नंतर कांही दिवसानी मठसंबंधी कारभारी होते त्यांणीं तत्रत्य आपल्या बंध्वास तेथील राजे व राजकीय त्यांस अनुकूल करून ग्रामस्त दाही ब्राह्मण मिळवून पुस्तकसन्यास देऊन मठांत स्थापिले, ऐसें ब्राह्मणमुखें ऐकून असा अशास्त्रीय व्यवहार होणार नाही असा संशय प्राप्त होवून कुडलगी मठास श्रीचे आगमन झालें. तेथें कारभारी व ब्राह्मणास प्रश्न केला की श्रीगुरूस्वामीनी आश्रम देवून मठसंरक्षणार्थ आह्मास आज्ञा झाली आहे. ऐसें वचन समस्तानें ऐकोन विनंती केली की संस्थानसंरक्षणार्थ श्रीस्वामी केले आहेत ऐसी विनंती केली. त्यास आज्ञा झाली की शास्त्रोक्त वंश दोन प्रकारचे, ब्रह्मविद्योपदेशेंकरून व उदरीं जन्म घेवून, ऐसे दोन प्रकारचे नसल्यास येत नाहीं. सन्यासाश्रमी गुरु संप्रदाय ज्ञानोपदेशेंकरूनच परंपरा चालायाचें तें नसल्यास वंशउच्छेद झाला ऐशी शास्त्रमर्यादा आहे. गुरुपदेशावांचून पुस्तकावरून झालेले सन्यासास आचार्यस्वामीची मठाधिकारिता कैशी प्राप्त होईल. ऐसें श्रीस्वामीची वाणी श्रवण करोन सकल कारभारी व ब्राह्मणसमुदाय स्तब्ध बैसले. परंतु राजकीय कारभारी येकरूप झालेवरून विचार राहिला ऐसें अंतःकरणी विचार करोन करवीरास गुरुसांनिध्य येवून व्यवस्था संपूर्ण निवेदन करून गुरुसन्निध राहिले. अनंतर कांही दिवसानी कुडलगीकर पुस्तकसन्यासी सातारेस येवून आचारव्यवहारप्रायश्चित्त करवीरकर स्वामी व आह्मी मिळोन करावें असें बहूतच प्रकार राजा शाहूछत्रपती यांस अनुकूल करावें ऐसा उद्योग केला. मग राजानीं संपूर्ण क्षेत्रस्थ ब्रह्मवृंद मिळवून सभा करून शास्त्रीय विचार पाहून मनास आणिलें, तेव्हां कुडलगीकरास सभासत् व छत्रपती मिळोन सांगितलें कीं तुह्मी पुस्तकावरून सन्यास घेतला. त्यास्तव श्रीआचार्य स्वामीस संस्थानाविषयी आग्रह धरावयास शास्त्राधार नाहीं. ऐसें सांगितलेवरून कुडलगीकर हे तीन निश्चक्र करून बैसले उप्रांतिक ह्मणो लागले की आह्मी आपले संस्थानास आलों त्याअर्थी तुह्मी सकल ब्रह्मवृंद व राजे मिळोन सांगाल त्याप्रमाणें ऐकूं. ऐसें बोलले त्याजवरून समस्तब्रह्मवृंद व राजे यास संकाचे प्राप्त होवून स्वामीस प्रार्थना केली की श्री आचार्य स्वामीचा नांवेंकरून कुडलगी मठांत देवार्चन ब्राह्मणसंतर्पण करून तुंगभद्रा मलापहरीमध्यें आचार व्यवहार प्रायश्चित्त करतील. त्यामर्यादात ग्रामवकमत तिकडे खर्चास आज्ञा दिली पाहिजे ह्मणोन करवीरचे श्रीचे प्रार्थना करून श्रीचे संतोषकरून मागोन घेतलें. त्याजवरून सकलाची विनंती मान्य करून कुडलगीकरास पूर्वोक्त विनंतीप्रकारें रहावें ह्मणून आज्ञा दिल्ही. तदनंतर कुडलगीकर सातारेहून स्वस्थानास निघोन गेले करवीरकर श्रीस्वामीस समस्तब्रह्मवृंद छत्रपति या समस्तानी सांप्रदायानुरूप आचार व्यवहार प्रायश्चित दीपाराधना पूजादिक मठास पावतें करून आज्ञाप्रमाणे राहूं ऐसें सकळ ब्रह्मवृंद व छत्रपती यानीं प्रार्थना करून करवीर संस्थानास पावतें केलें यास मर्यादा मलापहारी ऐलेकडे पूर्वपश्चिम समुद्रपर्यंत उत्तरदेश समग्र आचार व्यवहार प्रायश्चित्त व संचार करवीर स्वामीनी करावें या मर्यादामध्यें मठ संबंधी स्वास्थ क्षेत्रादिक श्रीकरवीरचे मठचे अन्नसंतर्पणास चालावें ऐसी व्यवस्था नियमन झालें ऐसे आचार्यस्वामिनां अवतारचरित्रकथा वक्तृश्रोतृणां फलदायिनी भवति अलमति विस्तरेण स्वस्तिरस्तु रुजु.
इत्यलम् ।