Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४४४ ]
श्री
शके १७९५.
यादी इस्तकंबिल तागाईत चांद्रसेनीवर ग्रामण्यें जाहली ती बि॥
१ पूर्वी ग्रामण्य जोगाईचे आंब्यास जालें. शके १३९१. ते समयीं निळकंट गुरु गोसावी यांणीं काशीस जाऊन शंकराचार्य आणून समाधान केलें.
१ दुसरें ग्रामण्य कोंकणांत जालें. ते समयीं काशीस जाऊन पत्रें आणून निराकर्ण जालें. शके
१ तिसरें ग्रामण्य चिटणीसाचे अवजी बल्लाळ बाचे मुंजीसमयीं रघुनाथपंती केलें. तें निराकर्ण गणेश जोशी दिक्षित शास्त्री टकले यांणीं केलें. शके १५९१.
१ चवथें ग्रामण्य कल्याण प्रांतीं जालें. त्याजला रघुनाथ पंडित अमात्याची पत्रें नेऊन निराकरण केलें. शके १५९७.
१ पांचवें ग्रामण्य यमाजी शिवदेव यांणी केलें. ते समयीं काशीहून ब्राह्मण व चिंतामण गुरुजींनीं निराकरण केले. शके १६६९.
१ सहावें ग्रामण्य सदोबा भाऊसाहेबीं उल्लेख केला. तें नानासाहेब पेशवे यांणी मना केलें. भाऊसाहेब पाणपतांत गत झाले.
१ सातवें ग्रामण्य नारायणराव बल्लाळ यांणी केलें. आठवे महिन्यांत मारले गेले. दादासाहेबी याद घेतली ती देविली. सखाराम हरीस.
१ आठवें ग्रामण्य माधवराव नारायण. शके १७१४ ता। १७१८ काशीहून पत्रें सरकार श्रीमंतांस आली. नंतर ( आपाशास्त्री ) पंचाईत जाली. सोडचिठ्ठीची पत्रें बाजीराव रघुनाथ यांची झाली. एक वेळ याद जाली, राहिली. दुसर्यानें पत्रें जाली.
१ नववें ग्रामण्य बाळाजीपंत नातू शके १७४५. शंकराचार्य स्वामीची पत्रें आनंदराव तासकर घेतलीं. निराकरण श्रीमंत बुवासाहेब यांणी केलें. बाळशास्त्री बिन जनार्दनशास्त्री व आबा पारसनीस होते.