Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)
[ ४४३ ]
श्री शक १७२५, पौष वद्य १
पौ। छ २७ रमजान,
सन अर्बा मयातैन
पौष मास.
राजश्री त्रिंबकराव नाना गोसावी यांसीः--
छ सकलगुणालंकृत अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो।
फत्तेसिंग भोंसले रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयलेखन करीत असलें पाहिजेः विशेष. आपणांकडील पत्र येऊन वर्तमान कळत नव्हतें. इतकियांत आपण पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाहाला. खंडणीपैकी बाकीच्या ऐवजाविशीं लि॥. त्यास, इकडील वर्तमान तर सांप्रत मलबा नगरकर, व लोखंडे, व भोसले, व घाटगे, यांच्या फौजा महाली येऊन मनस्वी दंगा केला आहे. हें सर्व राजश्री विठ्ठलराव पहातच आहेत. संस्थान बहुत पेंचांत आलें ; तो विस्तार कोठवर ल्याहावा ? या फौजेचा दंगा निवारण होवोन, स्वस्थ जाहालें ह्मणजे, थोडीबहुत ऐवजाची तरतूद करून, पाठवून देतों. आपणहि इकडील संस्थानचें अगत्य धरीत जावें. वरकड परियायें विठ्ठलराव लिहितील त्याजवरून ध्यानास येईल. निरंतर पत्र पाठवून चित्त संतोषवित जावें. रवाना छ० ११ रमजान. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंती.
लेखना-
वधिमुद्रा
श्रीशिवशंभु
स्वामिनि शाहूभूपेश
पार्थिवोत्तंसे ॥ परिणत
चेतोवृत्तेःफत्तेसिंहस्य
मुद्रेयं ॥
पौ छ २७, रमजान, सन अर्बा मया तैन. पौष मास.