Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सहावा (१८ वे शतक)

[ ४४१ ]

श्री. शके १७२० आषाढ शु॥ १०.

आपत्य आलीबहादुर चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना तागाईत छ ९ जिल्हेज पावेत मुक्काम नदीकनेनजीक कालीजर येथें साहेबाचे प्रतापेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. धारकर पंवार याचें पथक येथें सरकार चाकरीवर होतें. तें झाडून उठोन देशी गेले. वेत्रवती उतरून येथून पस्तीस कोसांवर पोंहचले. पथकें उठतील हें समजोन आपणांस वारंवार विनंति लिहिली. परंतु सरंजामी यास ताकीद जाली. आह्मी तर सरकारचाकरी जीवादारभ्य करितों. एक दोन लढाया दरम्यान बिघडल्या. तेव्हां कस्त मेहनत करून सरकारचा मुलूख राखिला व यशवंतराव नाईक निंबाळकर सरकारकामास आल्यापासून तर आजपर्यंत बुंदेले यांचे दुंडीमुळें व लोकांचे खायापियाचे वखवखीनें रात्रंदिवस चैन नाहीं. तत्राप सरकारचा नक्ष व दाब राखून मुलूक सांभाळिला आहे. हल्ली धारकर पंवार उठोन गेले आहेत. तरी पंवार यांचा सरंजाम जप्त करावयाची आज्ञा व्हावी व कांहीं गुन्हेगारी घ्यावी की बिना आज्ञा कसे उठोन गेले ? व पथक इकडे सरकारचे हुज़र जाऊन रवाना कराविलें पाहिजे. पहिले एक हुजरे आठ वर्षे जाऊन बसले आहेत. तसे आतांही जाऊन न बसे. ते बेमुरवत निकड करून पथक इकडे काढून पाठवित तें जालें पाहिजे. नाहीं तर येथील झाडून पथकें उठोन जातील. मग आमचें राहणेंही व्यर्थ आहे. याउपर धन्याची मर्जी असेल तसी आज्ञा व्हावी. आजपर्यंत चाकरी जातीनें मेहनत करून केली की, सरकारची सर्फराजी होईल. ते दूर राहोन आबरूस खाकी यावी असा समय येऊन बान खाला आहे. त्यास सेवकाकडून तर कांहीं अंतर पडलें नाही. सरकारची सेवाच जाणून आहों. तर लिहिल्या अन्वयें पंवार यांचा बंदोबस्त होऊन पथक चांगले सरंजामानसी इकडे रवाना करावयाची आज्ञा जाली पाहिजे. अथवा जसी आज्ञा आह्मांस येईल तसें करूं. इतकें अमर्यादा करून न ल्याहावें. परंतु येथें पथकें उठोन जाऊं लागल्यामुळें बहुत लौकिकांत अफवा जाली आहे की, पथके सरकारचे मर्जीशिवाय कसी उठोन जातील ? त्यास, आजपर्यंत वोढताड तर होतीच परंतु सारी फौज जमा न होती. ह्मणून येथें निभाव जाला. आतां पथकें जाऊं लागल्यास पेंच आवघड पडेल. यास्तव नाविलाज होऊन विनंति लिहिणें प्राप्त आली. त्यास येथे आह्मांस ठेवणें असल्यास सदरहूअन्वयें बंदोबस्त होऊन यावयाची आज्ञा व्हावी. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.

पौ। छ ८ मोहरम सन तिसा तिसैन. आषाढ मास.