Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[७२] श्री. १७ जुलै १७९५.
विज्ञापना ऐशीजे. शिद्दी अबदुलावर सदाशिव रड्डीनें छापा घातला, ते दिवशीं रड्डीस गोळी लागून ठार झाला असें येथें वर्तमान आलें. नवाबांनीं त्यास दहा रुपये इनाम दिलें. खरें वाटेना. याजकरितां फिरोन बातनीस पाठविलें होतें तो बातमीदार आजच नवाबाचे येथें आला. त्याचे सांगण्यांत जे, सदाशिव रड्डी अलीज्याहाबहाद्दूर याजवळ स्वस्थ आहे; त्याजकडील कोणी एक सरदार होता तो जाया झाला. ह्मणून वर्तमान. हैदराबाद येथील शहरच्या बुरजावरून तोफा आहेत. त्यांची चौकशी सरंजामाची करूं लागले. तेव्हां समजलें कीं, सारे तोफेच्या कानांत खिळे मारले आहेत. मग कोणी खिळे मारले असतील.ते असोत. आतां तोफेचे कानास बरमे करावयास लावले आहेत. याप्रमाणें तहकीक वर्तमान कोणीं येऊन सांगितलें. त्याजवरून लिहिलें असे. मागाहून चौकशी करून पक्कें असेल तें लिहिण्यांत येईल. र॥छ २९ जिल्हेज. हे विज्ञापना.
छ ६ मोहरम मु।। भागानगर
रवाना टप्यावरून.