Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[६३]                                                                                श्री.                                                                       १२ जुलै १७९५.                                                           
विनंति विज्ञापना. बेदरचा किल्ला व शहर दरोबस्त सदाशिव रड्डीनें घेतलें, शिद्दी अबदुल्लास धरून नेलें, हें वर्तमान नवाबाकडे आल्यानंतर बेदरचा किल्ला शिद्दी इमामखान याजकडे असतां त्याचे नायबानें किल्ला परवानगीशिवाय कसा दिला. लढाई होऊन किल्ला जावा. तें न होतां किल्ल्यांत दखल झाला. तेव्हां सूत्रानें हे गोष्ट झाली, ऐसें नवाबानीं मनांत आणून छ २३ जिल्हेज शनिवारीं दोनप्रहर दिवसा शिद्दी इमामखान व नूरमहमदखान व इसूफअल्लीखान शिद्दी इमाम याचा नायब, करोडगिरीचे कामावर होता, या त्रिवर्गांस बोलावून आणिलें. खिलवतीचे रोषन महालापुढें दोन अडीचशें बारगीर आणून बसविले होते. शिद्दी इमाम वगैरे त्रिवर्ग येतांच त्याचा सलाम बंगल्याखालून झाला. त्यांजपाशीं तरवारा, हत्यारें होतीं तीं बारगिरांनीं घेतलीं. त्रिवर्गांस कैद करावें ह्मणून हुकूम झाला. त्यावरून तिघांस बारगिरांनीं धरून कोठडींत घातलें. पहारे भोवते ठेविले. पायांत बेड्याही घालण्यासं हुकूम झाला, शिद्दी इमाम वगैरे तिघांचे घरीं चौक्या पाठवून बंदोबस्त झाला. त्यांजकडील मुत्सद्दी वगैरे त्यांचे वाड्यांत होते ते धरून नेले. याप्रमाणें झालें. सदाशिव, रड्डीनें जुरत व कारस्थानी करून किल्ला घेतला. शिद्दी अबदुल्लाखान यास मारिलें, याविषयींचा शब्द शिद्दी इमामखान याजवर किमपिही नाहीं. त्याचे जिमेस किल्ला इतका मात्र शब्द. सदाशिव रड्डी याजविषयीं राजे रेणूराव नवाबाजवळ खातरजमेनें बोलत असतां दगा बसला. हा शब्द आला. बेदरचेंही वर्तमान आलें. बेदरांत किल्लेदार शिद्दीकडील. शिद्दीचें बोलणें राजाजीचे विद्यमानें मामलत वगैरेचें सदाशिव रड्डीसारखा आरोप आला तर कसें करावें म्हणून त्यांनीं सलाह कैद करण्याविषयीं दिली. त्याजवरून कैद केले. ऐसें ऐकण्यांत. सारांश कैद केलें. र।। छ २४ जिल्हेज. हे विज्ञापना.