Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
पत्रें यादी वगैरे
[१] श्री. १६ जून १७९५.
छ २८ जिलकाद, मुक्काम भागानगर रवाना टप्यावर मंगळवार.
श्रीमंत राजश्री रावसाहेब स्वामीचें सेवेसीः--
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना तागायत छ २८ जिलकादपर्यंत मुक्काम हैदराबाद येथें स्वामीचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. नवाबाचे दरबारास गेलों, बोलणें झालें, नंतर नवाब वेगळे मीर अल्लम व राजे रेणुराव बोलले, नंतर एक दोन वेळ रेणूराव माझे येथें आले होते, इत्यादिक अलाहिदा पुरवणी पत्रांत मजकूर लिहिला आहे, त्याजवरून ध्यानांत येईल. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.