Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
पुढें दीक्षित व विंचुळकराकडील कारभारी बाळोबा बाबा हेही कामांत होते. इंग्रज याजकडील बोलणार पोटसाहेब येत होता. परंतु तो चाकर प्रभूकडील. मागें याचीं पलटणें चाकरीस माणकेश्वर याणीं रदबदली करून ठेविली होती. तेव्हां त्यास दरमहा रु॥६००० साहा हजार देत आणि दोन पलटणें चाकरीस असत. असा मजकूर पेशजी जाहाला होता. तेव्हां श्रीमंताकडील फौजा सरदार, उमराव जमा होतच चालले होते. त्यांचीं नावें आठविलीं तितकीं लिहिलीं आहेत. मुख्य बापू गोखले यांची फौज अजमासें पंधरा हजार पायदळ सुध्दां, व आबा पुरंधरे यांची फौज तीन हजार व नारो विष्णू, मिजरकर व रास्ते व थोरात व जाधव व नानाजी माणकेश्वर, श्रीमंत पंत प्रतिनिधी व दीक्षित यांचे दिमतीस फौज दोन हजार व विंचुळकर यांची फौज सुमारी दाहा हजार एकूण फौज सुमारी पन्नासा हजारांची भरती जाहाली पुढें कजिया कांहीं काढवा असें मसलतीस आलें. मसलत. गार मुत्सद्दीपैकीं गोविंदराव काळे हे मुख्य प्रभूपाशी. ढमढेरे वगैरे मंडळींची नावें कोण लिहितों ! मुख्यांचीं नावें लिहिली आहेत. अस्तु. कजिया काढिला कीं X X X X लढाईस उभे रहावें किंवा आमचा प्रांत खालसा केला आहे तो आमचा आम्हास द्यावा. तेव्हां इंग्रजाकडील बोलणें कीं आह्मीं तयार आहों. ऐशीं बोलणीं चालत आहेत तों सरकारच्या फौजा बाहेर उतरूं लागल्या. तेव्हां गोखले याजकडील सरदार पठाण, नाव त्याचे सरदारखा हा गारपीरास होता तो (बाहेर निघाला). तेव्हां इंग्रज याजकडील बोलणार दीक्षित याजकडे आले कीं हे काय? त्यासी ताकीद व्हावी. तेव्हां दीक्षितांनीं निघोन वाडयांत आले आणि यजमानाचे कानावर घातलें कीं त्यांचें बोलणें असें आहे कीं त्या पठाणास ताकीद व्हावी. तेव्हां आज्ञा जाहाली कीं हा मजकूर बापू गोखले यांस समजवावा, ते उत्तर करतील. तेव्हां दीक्षित यांणीं मशारनिल्हेयास मजकूर समजाविला. त्यांणीं उत्तर केलें कीं येथें त्यांस बहुमानें आणिलें आहे; तरी तुम्हीं आपले बेटांत जाऊन उतरांवे. असें उत्तर दीक्षित यांणीं इंग्रजांस सांगितलें. तेव्हां त्याणें यांचा जोर भारी असें बघून गारपीर सोडून जाऊन बेटापलीकडे उतरला. पुढें आश्विन वद्य ११ शके १७३९, ईश्वर संवत्सरी पुण्यांत हूल पडली कीं फिरंगी तयार जाहला. अशी आवई लोकांनीं खाऊनीं दुकानें बाजार बंद जाहाला. दोन प्रहरीं खासा स्वारी निघून पर्वतीस गेली. स्वारी ते दिवशीं घोडयावर होती. मागें गोखले व पुरंधरे वगैरे सरदार मंडळी जमुनी गेली. तेथें पाह्यरीवर बापू गोखले घोडयावरून उतरून पायावर डोकी ठेविली कीं मला आज्ञा असावी. ते वेळेस प्रभू साक्षात् सांब अवतार आशीर्वाद दिला कीं बाळाजी विश्वनाथ याचे पुण्य तुम्हांस तारो, सद्दी चालो. तेव्हां सर्वांनी पायावर डोकी ठेविली आणि आज्ञा घेऊन औंदचे मैदानांत गेले. त्यांची पलटणें खडकीच्या तळावर तयार जाहाली. दिवस पांच घटका राहिला. ते वेळेस यांची त्यांची लढाईची सुरवात जाहाली. नारो विष्णू याजकडील फौज X X X X जाहाली. तेव्हां इंग्रज आपले ठिकाणीं शिकस्त जाहाले. यांजकडील त्यांजकडील मिळून माणूस दोन हजार कामास आलें. पुढें ते आवळून खडकीवर तयार. यांजकडील फौजा गणेशखिंडीचे मैदानांत तयार. असें चारी प्रहर तेथें राहून प्रात:काळी सारे राजदर्शनास पर्वतीस आले. तेथें मसलत करून खासा स्वारी दोन घटका रात्रीस शुक्रवारचे वाडयांत आले. बारा घटका रात्रीं द्वादशीस निघून डेरा दाखल जाहाले. पुढें नित्य त्यांची यांची टाटू रोज होत चालली. विंचुरकर फितुरी अशी (बातमी) लष्करांत व शहरांत समजली. नारो विष्णू यांणीं नित्य कांहीं बैल वगैरे त्यांचे आणिले. पुढें अशी बातमी आली कीं नगराहून पलटणें तीन घेऊन दपटीन साहेब येत आहे. अशी वदंता येतांच नारो विष्णू पाच हजार फौज व दोन तोफा घेऊन गेले. आणि त्यांची यांची लढाई होत होत तिसरें दिवशीं साहेबाची खराबी बहुत होऊन खडकीस येऊन मिळाला. नारो विष्णू यांणीं दोन हजार बैल व चार गोरे धरून घेऊन आले. पुढें कार्तीक शुध्द ७ सप्तमीस दोन प्रहरीं इंग्रज यांणीं खडकी जवळ आहे ती सई केली. ते दिवशी गोखले व पुरंधरे छबिन्यास गेले. चारी प्रहर छबिना करून प्रात:काळी आपले लष्करांत आले. तेच दिवशीं रा चिंतामणराव आपा येऊन पोचले. तोफखान्यांतील महांकाळी तोफ गणपतराव पानशे यांणीं काढून नेली. तीहि लष्करापुढें सरकारचा तोफखाना तोफा सुमारी २० होत्या. तेथें नेऊन ही लाविली. ऐशी व्यवस्था शुध्द सप्तमीचे दिवशीं जाहाली.