Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(ड) दुसरे लग्न याच सालीं छ २९ जमादिलाखर (२५ मे १७५०) रोजी झाले. लक्ष्मण कृष्ण कोल्हटकर यांची बहीण. नांव पार्वतीबाई.
(ई) यांसी मुलें झाली होती ती लहानपणीच वारली, प्रसिध्दीस आली नाहीत.
(फ) इहिदे सितैन मया व अलफ पौष मासी पानिपतचे लढाईत नाहीसें झाले.
(ग) बायको पार्वतीबाई छ १७ रमजान अर्बा समानीन मया व अलफ साली वारली
(१६ आगष्ट १७८३). तो पावेतों भाऊसाहेब यांची क्रिया झाली नव्हती. खमस समानीन मया व अलफ उत्तर कार्य झाले.

 ९. विश्वासराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म छ ३० जमादिलावल सल्ला अर्बैन (२२ जुलै १७४२) साली झाला.
(ब) मौंज छ ३० रबिलावल तिस्सा अर्बैन मया व अलफ सालीं झाली (९ मार्च १७४९).
(क) लग्न छ ६ जमादिलाखर खमसैन (२ मे १७५०) साली झालें. सदाशिव दीक्षित पटवर्धन यांची कन्या, नांव लक्ष्मीबाई.
(ड) गर्भाधान समान खमसैनांत झालें.
(ई) पानिपतचे लढाईत इहिदे सितैन पौष शु॥ ८ रोजीं (१४ जानेवारी १७६१) गोळी लागून ठार पडले.
(फ) बायको सल्लास सितैन मया व अलफ, छ ३० रजब (१४ फेब्रुवारी १७६३) रोजी वारली.

 १०. माधवराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म माघ व॥ ११ सह १२ मंदवार, छ २५ मोहरम खमस अर्बैन मया व अलफ, शके १६६६ साली (१६ फेब्रुवारी १७४५) झाला. अकरा घटका दिवसास मकर राशी होती.
(ब) मौंज छ १० रबिलाखर इसने खमसैन मया व अलफ रोजी पुण्यास झाली. श्रीमंत नव्हते, सबब त्र्यंबकराव मामा पेठे यांणीं लाविली (१५ जानेवारी १७५२).
(क) लग्न अर्बा खमसैनांत छ १३ सफर मार्गशीर्ष शु॥ १४ रविवारीं झाले. शिवाजी बल्लाळ जोशी यांची कन्या. नाव रमाबाई. (९ डिसेंबर १७५३)
(ड) राज्याधिकार नानासाहेब वारल्यावर होऊन पेशवेपदाची वस्त्रे आषाढ शुध्द शके १६८३ (१७ जुलै १७६१) साताऱ्यास झाली.
(ई) शके १६९४ नंदननाम संवत्सरे व॥ ८ सोमवारी थेऊर मु॥ वारले. रमाबाई सती गेली (१८ नोव्हेंबर १७७२).

 ११. यशवंतराव बल्लाळ.
(अ) यांचा जन्म छ २९ साबान तिसा साली (१३ आगष्ट १७४८) झाला. लहानपणीच मृत्यू पावले.

 १२. नारायणराव बल्लाळ :
(अ) यांचा जन्म छ १ जिलकाद सीत खमसैन श्रावण शु॥ रविवारी शके १६७७(१० आगष्ट १७५५) झाला. कन्या रास होती.
(ब) मौज छ ३ जिलकाद इसने सितैनात साहेब यांणी केली (२८ मे १७६२).
(क) लग्न शके १६८५ वैशाख शुा ९ छ ८ सवाल अर्बा सितैन मया व अलफ, हवेली सिंहगड येथें झालें. कृष्णाजी हरी साठे यांची कन्या. नांव गंगाबाई.
(ड) गर्भाधान छ १२ रबिलावल सबैन मया व अलफ सालीं झालें.
(ई) पेशवेपदाचा अधिकार माधवराव बल्लाळ वारल्यावर प्राप्त होऊन वस्त्रें छ १७ रमजान सबैनांत साता-यास आवशीस दोन घटका रात्रीस झाली.
(फ) शके १६९५ विजयनाम संवत्सरे भाद्रपद शुा १३ सोमवार तिसरे प्रहरीं दिवसास शनवार वाड्यांत सुमेरसिंग वगैरे मारेक-यांनीं ठार मारिलें.
(ग) या वेळीं गंगाबाई गरोदर होती. पुढें तिचे पोटीं शके १६९६ अधिक वैशाख शुा ७ रोजीं सवाई माधवराव यांचा जन्म झाला.
(हु) गंगाबाई समान सबैन मया व अलफ सालीं छ ६ जमादिलाखर रोजीं ताप येऊन वारली. सकेशा होती.