Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

ऐसा तिचार केला. चव्हाणाचे विद्यमाने महाराजाकडे कारकून जाऊन हें विशमतेचें वर्तमान सांगितले, आणि तेथें चव्हाणांनी आंगेज केला. त्यावरून महाराजांनी हा मजकूर आरंभिला, व शिदोजीबावाचे कारभारी यासी महाराजांनी बोलाऊन नेऊन आज्ञा केली जे, येसाजी थोरात याची दौलत तुह्मी अनभविता, त्याचे मुलास खावयासि अन्न नाहीं, व त्याची घोडीपिडी त्याचे हवाली नाहीत, तुह्मी अवघी घेतली ऐशी बेमानी केली हे महाराजास मानत नाहीं, तरी याजउपरी त्याची पागा वगैरे जें बिछात असेल ती त्या मुलाचे हवाली करणें, त्यांची दौलत ते करतील, तुह्मांस त्याचे दौलतीस समंध नाहीं. ऐशे सांगितलेवर, शिदोजीबावा याजपाशीं कारभारी यांनीं आज्ञेप्रमाणें सांगितलेवर, बावांनीं फिरोन बापूजीपंतास पाठविलें जें, त्यांची घोडी त्यांजपाशीच आहेत, आमचा तालुका कांही नाहीं, खर्च मात्र आपण चालवितों, आणि शिकारोखा त्यांचेच नांवचा करतो, हिशेबकितेबही त्यांचेच कारकून करतात, आपण या गोष्टीस अलिप्त आहों, कोणी सांगितलें या गोष्टी बातील आहे, ऐसे सांगणें, त्यांची सरदारी महाराजांनी आपले गळी घातली, त्याजपासोन त्यांचा मनसबा आजिपावेतों राखिला, त्याजमुळें कर्ज आपले माथा भारी जाहलें, ऐसें असोन महाराज ऐसें ह्मणतात, यावरून हे गोष्टी अपूर्व आहे. ऐसें सांगितलेप्रमाणें फिरोन महाराजापाशी सांगितलेवर, हे गोष्टी तुह्मी ह्मणता तरी शिदबांनी येथे यावें आणि बोलतां याप्रमाणें आपनाशीं बोलावें ह्मणून बोलिलेवर, बापूजीपंत येऊन सांगताच शिदोजीबावा पांच सात लोकांनिशी सदरेस गेले. तेथें बोली घातली. यांनी जो मजकूर होता तो सांगितला ! परंतु महाराजाचे चित्तास ते गोष्टी नये. मग नजर एक प्रकारची धरून त्याची पागा आणवणें ह्मणून बोलिलेवर, यानें महाराजास सांगितलें कीं, महाराज ! त्यांची पागा त्यांजपाशीच आहे, त्यांस बोलाऊन आज्ञा करावी, ते आपली पागा वगैरे जें कांही असेल तें घेऊन येतील, आमचा आडथळा कांही नाहीं. ऐसें ह्मणतांच उदाजी थोरात यासी महाराज यांनी सांगितलें कीं, तुह्मी आपली पागा घेऊन येणें. ऐसे बोलोन आपले हुजरे बराबर दिले. त्यांनी जाऊन आपली पागा, जैशी तालुकांती होती तैशी, आपली घेऊन येऊन जवळ उतरले. निशाण नगारा वगैरे जे काय बिछात होती ती अवघी घेऊन आलेवर, शिदोजीबावास बोलों लागले जे, याजउपरी तुह्मीं या मुलाचे ताबिजातीस राहणें, आणि याची बंदोबस्ती चव्हाणाशीं सांगितली आहे ते करितील. ऐसे बोलताच शिदोजी बाबांनी उत्तर दिल्हे जें महाराज ! हे गोष्टी आपणास होणें नाहीं, त्या मुलाचा तालुका होता तो गुदरला, आपण चाकरी करीत नाहीं, लोकांची देणीघेणीं व कर्जे भारी जाहलें, हें महाराजांनी त्यांचे त्याजकडोन वारवावें आणि आपणास निरोप दिल्हा ह्मणजे जाऊं ऐसें बोलतांच महाराजांस विषाद येऊन बोलों लागले जे, जाखलेचें ठाणे आमचे येणें त्याचा जामीन देणें आणि तुह्मी निरोप घेऊन जाणें. ऐसा पेंच घातला. तेव्हा जामीन कोणी द्यावा त्याचे नांव घेतांच न घेऊं ह्मणत. चव्हाणांचे नाव घ्यावें, त्यास जामीन द्यावें, ऐसे महाराजांचे मानस.