Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
येसबास निरोप दिला, आणि आपले जागा विचार केला जे, सकाळीं फौजा येऊन गांठतील. या जागा राहिलियानें अब्रू राहणार नाहीं. मग गांवास आगी घालोन रातोरात मुलेंमाणसें व जमाव आपला घेऊन पन्हाळेस गेले. तेथें माचीस जाऊन राहिलेवर महाराजांचें लष्कर इसलामपुराहून कूच होऊन खेडपुणदीवर मुक्काम जाहला, येळावीस ठाणें पाठविलें. आणि महाराज फिरोन माघारे साताऱ्याकडे गेलेवर संभाजी महाराज यांनीं मनसुबा आरंभिला. आपला जमाव पिराजी घोरपडे व शिदोजी घोरपडे व शिंदे, नरगुंदे अवघे जमाव करीत चालले. आपले तीर्थरूप बरोबर होते. भारी जमाव करून, महाराजांनीं तोरगलाहून कूच दरकूच करून येऊन, अष्टेचे ठाणेस वेढा घातला. तेव्हां येसबा येऊन भेटले. आणि ठाणें पंधरा दिवसांनीं घ्यावें, ऐसा करार केला. लष्कर कूच होऊन शिराळेस गेलें. तेथें सूर्याजी थोरात, आपले चुलते होते. तेंही ठाणें घेऊन, त्यास कैद करून, वडगांवास जाऊन वेढा घालून बैसले. येसबास कैदेंत ठेविलें होते, ते शिराळेचे तळावरूनच रात्रीं निघोन इसलामपुरास आले. तेथें राजश्री बाळाजी विश्वनाथ होते, त्यांची भेटी जहालियावरआपला जमाव अवघा अष्टेंतच होता. सडे राहिले. आणि सातारेस महाराजस्वामीस विनंतिपत्र लिहिलें कीं, वडगांव घेतांच अष्टेस महाराज येऊन बैसतील, एसमयीं उपराळा केलियानें हा मुलूख महाराजांचा राहतो, व आपली अब्रू राहती. ऐशीं पत्रें पाठविलीं. तंव महाराजांनीं राजश्री रावप्रतिनिधीस रवाना केलें, व फत्तेसिंगबावा भोसले तुळजापुराजवळ भारी फौजेनिशीं होते, त्यास हुजरे पाठऊन आणिलें, उभयतांची भेटी मौजे बुरलीवर जाहली. येसबाही प्रतिनिधीस भेटलेवर तेच रोजीं फौजा चालून वडगांवावर गेल्या. युध्द बरेंच जाहलें. संभाजी महाराजांचा मोड जाहला. तेव्हां अवघें लष्कर लुटलें, व कितेक सरदार धरून आणले. व महाराजांची मातुश्री सांपडली. सडे महाराज पन्हाळेस निघोन गेले. आपले तीर्थरूपही पळोन पन्हाळेस गेले. रावप्रतिनिधी व फत्तेसिंगबावा फत्ते करून २७ हत्ती सांपडले ते घेऊन, अष्टेस मुक्कामास आले. येसबास हत्ती तखताचा गजराज सांपडला होता तो तैसाच अष्टेंत राहिला. दुसरे रोजी येसबास अष्टेंत ठेऊन, प्रतिनिधी व फत्तेसिंगबावा सातारेस महाराजांचे दर्शनास गेलेवरी, महिना दीड महिना जाहला. तंव हत्तीचा मजकूर महाराजांपाशी जाहला. तेव्हां हत्ती घेऊन दर्शनास येणें ह्मणून महाराजांनी हुजरे पाठविलेवर येसबा साताऱ्यासी गेले. महाराजांचे दर्शन जाहलें.