Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

तेसमयीं घोडा व बिछात होती ती कर्जदारास व लोकांस देऊं लागली. मग तेसमयीं सर्वांनी विचार केला कीं, या नायकीस आव शिदोजी थोरात यांनी घालावा, लोकांचा दिलासा करून कर्जदारांचा हवाला घ्यावा, आणि हे नायकी थोर आहे, बुडवूं नये. ऐवे समस्तांनी शिदोजीबावास सांगून उभे केले. तेव्हा यांनीं गोडाबाईपाशीं जाऊन अवघे लोकांची व कर्जदारांची निशा केली. त्यावर गोडाबाईनें अग्नप्रवेश केला. पुढें येसबाची नायकी गळा पडली. मूल लहान, तेव्हां महाराजांपासोन पूर्ववत् सरंजाम करार करून मुलाचे नावें सनदा करून घेतल्या, व शिरपाव मुलास देवविला. शिक्का रोखा येसबाचे भावाचे नांवें चालवून तमाम नायकीचा बंदोबस्त केला. तेव्हां कर्ज भारी जाहले; आणि चव्हाणाशीं दावा जबरदस्त; लोक भारी ठेवावे लागले याजमुळें कर्जाशी समंध पडला. तंव पुढें कोल्हापूरचा वेढा उठून माघारा गेला. मग आपले बापानीं फौज भारी ठेऊन सातारेपावेतों धामधूम आरंभिली. आष्टेचे ठाणेस येऊन वेढा घातला. तेव्हां श्रीमंत राजश्री बाबामंत्री यांचा जिल्हा होता. धामधूम जाहली. मग महाराजांनी राव प्रतिनिधीस जिल्हा सांगितला. इसलामपुरी बापूजी रायाजी भारी जमावानिशीं ठेविलें, व अष्टेंत अण्णापा मामा ठेविले. ऐशी बंदोबस्ती करून राव प्रतिनिधी इसलामपुराहून माघारा गेले. तव प्रजन्यकाळ आला. शिदोजीबावा पनाळियास होते. तें ठाणें पावसाळयामुळें न सोसे. मग महाराजापाशीं जाखले ह्मणून एक दिवशीं हे स्वारीस गेले ते संध पाहून, चव्हाणांनी जाखलीस येऊन, पागा तेथें होती ती ६५ घोडीं घेऊन गेले. हे स्वारीहून माघारे आलेवर, चव्हाणाशी कजिया युध्दाचा करावा ऐसें केलें. तेव्हां लोक भारी आणखी ठेवावे लागले. त्यामुळे आणखी कर्ज भारी जाहलें. मग महाराजांनी विठोजी चव्हाणाशी सांगून घोडी नेहली व देवविली; उभयतां भांडू नयें ऐसें केलें. परंतु किलाफ जबरदस्त! येसबाची क्रिया जाहली तेव्हा बारावे दिवशी कावळा पिंड न शिवे. तेसमयीं आपले तीर्थरूप यांनी चव्हाणाशी दावा राखितों ह्मणून बोलताच कावळा पिंड शिवला. ते ईर धरून विरोध राखितच गेले. प्रजन्यकाळ जाहलेवर संभाजी माहाराज यांनी पनाळेहून उतरून चिकोडीपाशीं जाऊन फौज जमा करूं लागले. जाखलेस खासा महाराज येऊन शिदोजीबावास जमावसहित बराबर घेऊन गेले. व विठोजी चव्हाणही बराबर होते. पुढें पिराजी घोरपडे कितेक काटक ठेवून येऊन भेटलेवर शिदोजी घोरपडेही येऊन भेटले. जमाव भारी जाहला. इलाचीबेग हुकेरी कडून पिराजी घोरपडे याचे विद्यमानें भेटले. पुढें कूच करून लष्कर नागपूरनजीक कंकणवाडीस मुक्कामास गेले. ते वख्ता त्या मोकामावर येसबाचे मातोश्रीस भर भरून सांगितलें की, तुझी मुले नेणती, शिदोजी थोरात याचें पळणे भारी पडलें, पुढें घोडीपिढीं अवघी घेऊन तुमचें काहींच नाहीसें करतील, तरी तुह्मी महाराजाकडे जाऊन संधान विठोजी चव्हाण याचे विद्यमानें करून आपली नायकी सचंतर करावी.