Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[३१०]                                                                       श्री.                                                                  ३ सप्टंबर १७४०.

पुरवणी तीर्थस्वरूप राजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. आशीर्वादपत्रीं आज्ञा केली की, कोण्हे गोष्टीचे पुष्टिबळ नसतां राजश्री आप्पा याजसीं विरुध्द दाखविता हे कोण गोष्ट; याउपरी ते सांगतील तें ऐकत जाणें; स्नेहामध्यें अंतर न पावणें; ह्मणोन कितेक प्रकारें आज्ञा केली. ऐशास त्यांचे आमचे वडिलपरंपरेपासून जो ऋणानुबंध चालत आला आहे त्यांजमध्यें ऐसें नाहीं कीं उभयपक्षी स्नेहांत अंतर जाहलें, व एकएकाचें संकट एकएकाही न वारिलें. असें हाकालपावेतों होऊन आलें नाहीं. सांप्रतकाळें उभयपक्षी वडिलांमागें त्यांचा आमचा ऋणानुबंध ह्मणावा तरी राजश्री राऊ व राजश्री आप्पा दाजी यांसी वडिलांची जागा मानून संकटांचे निरसन व सौख्याचें त्याचें, आगमन स्नेहेकडून समजून उभयतां दाजीखेरीज दुसरा अवलंब समजत नसों. व हरएकविशी बुध्दनीत आह्मांस सांगत आले आहेत, ते आह्मीहीं स्वहितास योग्य पाहून ऐकोन वर्तणूक करीत आहों. पुढेंही आह्मांस सर्वस्वें अवलंब त्यांचाच आहे. असें असतां आह्मीं त्यांचें ऐकत नाहीं या गोष्टीचा आपणांपावेतों लौकिक काय ह्मणून गेला आहे, त्याचा अर्थ आपल्यास काहीं कळत नाहीं. वरकड आपला आशीर्वाद व कैलासवासी आबासाहेबांचें पुण्य ऐसें नाहीं कीं वडिलांचे मनसबेयामध्ये न्यून पाहून राजश्री राऊ व राजश्री आप्पा दाजींचे स्नेहास अंतर करून घेऊन. ऐशी आमची वर्तणूक आहे व होईल असें नाहीं. हा आशीर्वाद आपला आहे. वडिलांची तप:श्चर्या आपले कृपेनुरूप तैसीच आहे ! आणि हाकालपावेतों त्याच सामर्थ्येकडून चालत असे व चालले व आपण कृपा करतीलच. यापेक्षां आणखी पुष्टिबळ आह्मांस कोणतें असावें ? येविसीं सेवेसी लिहावें तरी स्वामी समर्थ अंतरसाक्षी असेत. सेवेसी श्रृत होय. विज्ञापना.