Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२६७] श्री. १५ मे १७३१.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूपबावा स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार चरणावर मस्तक ठेवून दंडवत विनंति उपरि येथील क्षेम तागाईत वैशाख शुध्द पंचमी मंदवारपर्यंत स्वामीचे कृपेकरून सुखरूप असों. यानंतर बहुत दिवस क्रमले. परंतु आशीर्वादपत्र पाठवून परामर्ष न केला, त्यावरून चित्तांस संतोष वाटत नाहीं. याउपरी येणारांसमवेत आशीर्वादपत्रिका पाठवून सांभाळ केला पाहिजे विशेष. चिरंजीव तुळाजी आंगरे यांची सोईरीक, आपण तद्देशीं पाहिली असेल, ह्मणून वर्तमान ऐकीवेंत असें. तरी आपण सोईरीक उत्तम नवरीही पाहोन ठेविलीच असेल, अथवा पाहिली नसली तरी चिरंजीवायोग्य सोईरीक नेमस्त करून, नवरी पाहोन, तिचा बाप बरा नामांकित पिढिजादा ऐसा, बरा, स्वामींच्याही विचारें योग्य, ऐसी निश्चयता करून लेख पाठविला ह्मणजे त्याचा विचार करून, स्वामीस लिहून पाठवून. उपरांत घटवटणा होऊन येईल. स्वामीचें आगमन येप्रांतीं कधीं होईल, याचा भावार्थ लिहिला पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.