Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[२६१]                                                                       श्री.                                                                 

पुरवणी श्रीसच्चिदानंदकंद परमहंस भृगुनंदनस्वरूपेभ्यो स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरी स्वामीनीं पवळी पाठविलीं ती लिहिलेप्रमाणें प्रविष्ट जालीं. त्याची किंमत रुपये १२५ सवाशे लि॥ त्याप्रमाणें मान्य करून सदरहू सवाशे रुपये व पांचशे पाठवितों ह्मणोन स्वामीस लि॥ होतें ते, एकूण सवासाहाशे जाले. त्यापैकीं तीनशे बारा रु॥ येथें रामजीजवळी देऊन र॥ केले असेत. राहिले ३१३ तीनशे तेरा हे सुवर्णदुर्गाहून पत्रदर्शनीं देणें ह्मणोन लिहून तेथून देविले ते स्वामीस पावतील. याप्रों। रवानगी केली असे. याखेरीज तीन माळा उंच मोठ्या आहेत ह्मणोन लिहिलें तरी त्या तिन्ही माळा त्याची किंमत लेहून पाठऊन दिल्ह्या पाहिजेत. त्याचें द्रव्य दोहप्तें पाठऊन देऊन स्वामीनीं जायफळ, जायपत्री, लवंगा व तेलाविशीं लेख केला, त्यास सुवासिक तेल तो सिद्ध नव्हतें या निमित्य पाठविलें नाहीं. वरकड लवंगा वजन 261 1 व जायफळ 261 1 व जायपत्री 261 2 याप्रमाणें पाठविले असे. अंगिकार केला पाहिजे. श्रीसंनिध तुमचा नंदादीप लाविला ह्मणोन आज्ञा, तरी हे गोष्टी स्वामीनीं बहुत उत्तम केली. बहुत समाधान पावलों. तुजला आणखी उदंड आहेत ह्मणोन लि॥. आह्मास आहेत खरेच. परंतु वरकड आहेत ते आहेत व स्वामीही आहेत याचेही साक्षी स्वामी नसतील काय ? बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति.