Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२६९] श्री. १८ नोव्हेंबर १७३३.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी.
सेवक संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति तागाईत कार्तिक शुध्द नवमी रविवारपावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून वर्तमान कुशल असे. विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहला. सारांश राजश्री अंताजी शिवदेव यांणी डोरले व माहळुंगे यावरी रोखा करून एकशें तेतीस रुपये वसूल घेतला. त्याचा मुबदला करून ऐवज आणवावा ह्मणोन आज्ञापिलें. ऐशास, स्वामीचें आज्ञेपरतें थोर आहे ऐसें नाहीं. मुबदला करावयास उशीर काय आहे ? परंतु अंताजी शिवदेव जमावानसीं मांचालास विशाळगडचे परिघास आहेत. त्यास, आह्मांकडील मुलुक न्यूनव्यवस्था आहे, त्याचा उछेद करावा हे गोष्टी सर्वांच्या चित्तांत. आमच्या मुलकाचें सर्वांस वैशम्य. तदनुरूप लष्करचे सरदार मनस्वी चर्चाही खालीं उतरावच्या करितात. असें असतां मोबदला करावा तेव्हां येखादे फंद करावयास चुकणार नाहींत. यानिमित्य सध्यां इकडून चर्चा करितां येत नाही. तरी स्वामींनींच राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधी यांस लिहून, रुपये नेले आहेत. त्यांचा निर्वाह करविला पाहिजे. मांचालास लष्कर नसतें ह्मणजे आज्ञेप्रमाणें मोबदला अलबता केला जाता. वरकड अनुष्ठानास तीळ दोन खंडीपावेतों विकत मिळवून घ्यावयाची आज्ञा. आज्ञेप्रमाणें त्रिंबक कृष्ण यांजपासून रुपये घेऊन तीळ करेदी करून देऊन. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें कृपा वर्धमान करावी हे विनंति.