Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७०] श्री. ५ जून १७३५.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल चरणांवरी मस्तक ठेऊन दंडवत् विनंति. उपरी येथील कुशल तागाईत ज्येष्ठ बहुल दशमी गुरुवारपावेतों स्वामीच्या आशीर्वादेंकरून सुखरूप असो. यानंतर आशीर्वादपत्रिका पाठविली, पावोन बहुत कांहीं संतोष जाहला. पत्रीं लिहिलें की पत्राचा अन्यय सर्वही चित्तांत आणून उत्तर पाठविलें ह्मणजे हळूहळू दर्शनास येऊन. ऐशास आपण येऊन, दर्शनाचा लाभ देऊन, आमचा सांभाळ करावा, हें आपणास उचित आहे. तेथें आह्मीं विस्तार लिहावा काय असे ? आपण आह्मांस वडील. पूज्य. सर्वमान अभिमान आमचा आपणास लागला आहे. आजीकालींच आह्मी लिहितों असें नाहीं. वडिलांपासून हें घर स्वामीचें. आह्मी, आह्मीं स्वामीची सेवा करावी, याउपरि सर्व गोष्टी एकीकडेस ठेऊन, हळूहळू येऊन, दर्शन देऊन. सवेंच फिरोन रवानगी करून वरकड तीन गांव गोवळकोटासंनिध श्रीस पूर्वापार इनामत आहेत. त्यास हालीं शामलाकडून करार होत नाहीं, त्यास शासनाक्रांत करावें, हा एक अर्थ. दुसरा अर्थ, राजपुरीस दबावानें लिहून पाठवून करार करून घ्यावे ह्मणून लिहिलें. तरी श्रीच्या कार्यास सेवकांपासून सहसा अंतर होणार नाहीं. शासनाचा अर्थ लिहिला तरी प्रस्तुत चातुर्मास प्रजन्याचा प्रसंग आहे. त्याचा विचार आमचें चित्तीं बहुत दिवस आहे. कालवशेंकरून घडोन आला नाहीं; परंतु याउपरि याणें मर्यादा सोडिली आहे. त्याचा योग सहजेंच घडोन येत आहे. तोही प्रसंग शीघ्रकालेंकरून घडोन यावा असाच आपला आशीर्वाद आहे. वरकड त्यास लेहून पाठवावें ह्मणोन लिहिले. त्यावरून आह्मीं त्यास लेहून पाठवितों. इतक्यांत आपणही अती सत्वर निघोन येथें यावें तों त्याचाही जाब येईल. त्यासारिखा आपल्या विचारें त्याचा पुढें विचार करून आपण दर्शनास आले पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दिल्हा पाहिजे हे विज्ञापना.