Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१९६] श्री. ३० जुलै १७५७.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी यांसी :-
पो बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. शहानवाजखान आमचे, आमच्या विचारें चालतात, हा आरोप नवाब सलाबतजंगीं ठेवून, बसालतजंग कनिष्ठ बंधू व आपण एक होऊन, शहानवाजखान यांची मुतलक वकिली तगीर करून, बसालतजंगास सांगितली. त्याजवरून शहानवाजखान यांणी संदेह चित्तांत आणून दौलताबादेस गेले, किल्ला बळकाविला आहे. इतका मनसुबा केला, यास संमत निजामअल्लीचें घेतले असेल. त्याचे विचाराखेरीज केलें नसेल. व तेहि अवरंगाबादेस येणार. आह्मास या गोष्ठीचा इतल्ला किमपि दिल्हा नाही. तस्मात्, त्यांच्या कर्तव्याचा प्रकार एक प्रकार दिसतो. निजामअल्ली अवरंगाबादेस यावयाचा मनसुबा करितील. तर तुह्मीं युक्तीने व स्नेहाच्या वाटेनें सांगून त्यांचें येणें अवरंगाबादेस न होय तें जरूर करणें. गोड बोलूनच त्यांचा येण्याचा मनसुबा मोडावा. कदाचित् तुमचें सांगितलें न ऐकतां येऊंच लागले, तरी बराच कजिया करून आपले जागा स्थिर होऊन रहात तें करावें. येवशीं जानोजी बावास लिहिले असे. तरी याप्रमाणें करणें. जाणिजे. छ १३ जिलकाद. + जरूर निजामअल्ली अवरंगाबादेस न येत तें करणें, हरप्रकारें. बहुत काय लिहिणें. हे विनंति.