Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[६४]                                                                                  श्री.                                                                 

देशमुखी प्रांत वांई राजश्री नागोजीराव नाईक पिसाळ मूळ पुरुष याशी नऊ गांव खात होते. त्यांनी आपले पुत्रांस गांव वाटून दिल्हे असेत.

याशी तपशील :-
थोरले बायकोचे पुत्र ५ पांच. त्यापे॥
दोघांचे नक्कल झाले. बाकी तिघे पुत्र
राहिले. यांशी गांव दिल्हे ४॥ याशी
तपशील.

धाकटे बायकोचे पुत्र तीन यांशी
गांव ४॥.
याशी तपशील.
२ राजश्री सूर्याजीराव पिसाळ. .॥. मौजें वोझर्डे निमें.
१ चांदक संमत हवेली. ३ संमत कोरेगांव.
१ तडवळें संमत कोरेगांव मोकदम
तेथील धुमाळ व झांजुरणें.
१ कटापूर.
-------- १ किन्हई भोसल्याची.
१ पाडळी फाळक्याची.
१ राजश्री रामोजी नाईक याशी
ल्ह्यासुरणें संत कोरेगांव.
----------------
१ राजश्री अंतूजी नाईक पिसाळ
याशी मरटें संमत निंब.
.॥. मौजे वोझर्डे निम्में निम्में तिघांशे
देशमुखीचा हक्कदारी हिशास रुपये ५ पांच प्रो.
१ सोनकें संत वाघोली
धुमाळाची.
------------ ------------------
४॥ ॥४

 
सदरहू येणेंप्रो वांटणी आपले आपली खात होते. कोणाचा तंटा भांडण हा कालपर्यंत नाहीं. सदरहू न्याहारखान गोरी यानें मातुश्री पिलाऊ यांजपासून देशमुखी घेतली. आणि फिरोन कोणीं पिसाळाची देशमुखी ह्मणेल त्यास पायलीभर मीठ चारावें. असें झालें यावर राजश्री सूर्याजीराव पिसाळ याणीं पातशहापाशीं जाऊन गळा कफणी घालून दिवा दिवटया लाऊन फिर्याद केली. मग पातशहापाशीं अर्ज करून मग न्याहारखान तागीर केला. ते समयीं वतनास खर्च सावकाराचें कर्ज घेऊन दोन लक्ष रुपये खर्च केला. पादशाहास व दरबार खर्च करून वतन बहाल करून घेतलें. मग सूर्याराव वांईस आले. ऐशियास पिलाऊ पिसाळ याशीं पुत्र नव्हता. त्यांणी आपले दीर गंगाजी नाईक यांचा पुत्र दत्ताजी नाईक आपले ओटियांत पुत्र ह्मणून घेतलें. ते व सूर्याराव एक होऊन पातशाहापाशी वतनाचा मजकूर जो झाला, तो सूर्याराव याणीं दत्ताजी नाईक याशीं निवेदन केला. त्यावरून दत्ताजी नाईक समाधान पावलें. दत्ताजी नाईक सूर्याराव यास बोलिले जे :- पिसाळाचे वंशी तुह्मी खस्त करून गेले होते, त्यास दोन लक्ष रुपये खर्च करून वतन सोडविलें, त्यास जो खर्च पडला तो तुह्मी सांभाळणें, आणि देशमुखीचें वतन निम्में तुह्मी खावें, निमें आपण खावें. ऐसा करार होऊन श्रीकृष्णातिरीं रवीधोडीजवळी देशपांडिये व देशक व कसबें मजकूरचे पाटील व चापशेट व ह्माजण समस्त मिळऊन गंभीर सागर गोसावी याचे मठीचा एक रोटी आणून दत्ताजी नाईक याणीं आपले हाती घेऊन श्रीकृष्णेत उभे राहून रोटी निम्में बरोबर करून अर्धी रोटी आपले लेंकाचे हाती केशवजी नाईक याचे हाती दिली.