Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[६०] श्री. १३ अक्टोबर १७६१
चिरंजीव राजश्री महिपतराव त्रिंबक यांशी.
माधवराव बल्लाळ प्रधान आशीर्वाद. उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पीरखान यानें हुजूर विदित केलें की मौजे वोझर्डे आपल्यास व आपले भावाबंदास इनाम जमीन कुलबाब कुलकानू देखील मुकादमी व जमीन चावर बि॥
कित्ता कित्ता
१६ पदमसिंग ५ इमामखान.
१०॥२० मालोजी पिसाळ ४ फरीदखान
२।१० पीरखान.
२ छटूखान.
--------------- -------------------
२६॥२० १३॥१०
येकूण चाळीस चावर जमीन व मुकादमीचा काईदा वांटणी करून घेऊन भोगवटियास कैलासवासी महाराजांनी इनामपत्रें करून दिल्ही. त्याप्रमाणें भोगवटा वांटणीचा चालत आला असता हल्लीं दोन वर्षे पदमसिंग व मालोजी पिसाळ सदरहू जमीन व मुकादमीचा काइदा खतांत आपल्यास व आपले भावबंदास काही देत नाहीं. याजकरितां ताकीद झाली पाहिजे, ह्मणोन त्यावरून हे पत्र लिहिलें असे. तरी सुदामत चालत आले असेल व कैलासवासी महाराजांनी वांटणीची पत्रें करून दिल्ही असतील ती मनास आणून त्याप्रमाणें चालवणें. पदमसिंग व मालोजी पिसाळ धटाई करीत असले तरी निक्षून ताकीद करून गैरवाजवी करूं न देणें. जाणिजे. छ १४ रबिलावल सु॥ इसने सितेन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.
शिक्का.
केशवजी नाईक बिन दत्ताजी नाईक देसाई.
कानोजी पिसाळ.
तानाजी लिंगोजी व गिरजी झिंगो देशपांडे
कृष्णाशेट शेटीया क॥ वाई.