Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

ते गोष्टी सूर्याराव यांनी ऐकून हुजूर महाराजापाशी उभे राहिले की, आपण येथें जवळ आहोत. महाराज बोलिले जें :- आह्मास नजर देणें. तुमचें वतन तुह्मांस निम्मेच्या सनदा करून देतों, आणि निम्मेच्या सनदा दत्ताजी नाईक याशीही देशमुखीच्या करून देतों. त्याजवरून सूर्याराव याणी राजश्री राजजी थोरात व सुलतांजी थोरात व दमाजी थोरात यांजकडे जाऊन त्याजपासून कर्ज घेऊन सोनें, रुपें १५,००० पंधरा हजाराचे व नक्त रुपये १५,००० येकूण तीस हजार रुपये नजर, महाराज स्वामीस देऊन व दत्ताजी नाईक यानींही धनाजी जाधवराव याचे गुजारतीनें नजर स्वामीस देणें ती दिल्ही. त्याजवरील रांगणाचे मुक्कामी राजश्री दत्ताजी नाईक याशी निम्मे देशमुखीचीं पत्रें करून दिल्ही. व सूर्याराव पिसाळ यासही निम्में देशमुखीचीं पत्रें करून दिल्ही. शिक्याचा मजकूर उभयतांनी महाराज स्वामीस पुशिला. त्याजवरही महाराज स्वामी बोलिले जे :- वांई देशाची लावणी करणें. आह्मीही त्या प्रांते आलियावरी शिक्याचा मजकूर विल्हेस लाऊं. त्याजवरी उभयता देशास आले. महाराज स्वामीची छावणी जाहली. मग दुसरे वर्षी महाराज स्वामी या प्रांते आले. किल्ले वंदनगडावरी छावण्या करून राहिले. मग वंदनचे मुक्कामी गंगाजी नाईक व दत्ताजी नाईक व त्यांचे भाऊ कुळ पिसाळ मिळाले. तेथून कूच होऊन मरढियावरी राजश्री स्वामीचा मुक्काम जाहला. तेथें तमाम अष्टप्रधान व चंद्रसेन जाधवराव असे होते. ते समई सारे पिसाळ उभे करून महाराज स्वामीनीं गंगाजी नाईक याशीं विचारिलें जें :- सूर्याराव तुह्मांस काय होते. ते बोलिले जे :- माझा पुतण्या होय. त्यावरी दत्ताजी नाईक याशी विचारले. त्यास दत्ताजी नाईक बोलिले जें :- गंगाजी नाईक आपले बाप. व आपले भाऊबंद सारे सूर्याराव याशी मिळाले. मग दत्ताजी नाईक बोलिला जे :- सूर्याराव आपला भाऊ नव्हे. त्याजवरून महाराज स्वामीस राग आला. मोंगलाईतील न्याहारखानानें देशमुखी घेतली होती ती सूर्याराव यानेंच सोडविली असें महाराज स्वामीस विदित होतें. आणि हल्लीही येथील मजकूर कित्येक लोकांनी निवेदन सूर्याराव यांजविशीं केला होता. त्याजवरून देशमुखीचें वतन अमानत करून जोत्याजी केसरकर सरदेशमुख यांचे हवाली देशमुखीचें वतन केले असें. सूर्यारावही यांच्या हाताखाली देशमुखीचा कारभारी करीत होते. त्याजवरी महादाजी गणेश यांच्या हाताखाली सूर्याराव कारभार करीत होते. त्याजवरी मोरो जिवाजी देशपांडे यांच्या हवालीं देशमुखीची मुतालकी करून सूर्याराव याशीं महाराज छत्रपति बोलिले :- मौजे वोझर्डे हा गांव कुलबाब कुलकानूदेखील, हक्कदारदेखील दरोबस्त खाऊन सुखरूप राहणें. असे असतां जनाई जाधवीण भुईंजकर इनें महाराज स्वामीस अर्ज करून राणोजी नाईक पिसाळ याशीं वोझर्डेपैकीं दोन चाव्हर जमीन बरोबर चोपदार देऊन मोजून पदरी घातली. दोन चाव्हर खात होते. याशी साक्ष देशाधिकारी व देशक.