Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५९] श्री. २३ अक्टोबर १७१०
श्री शके १६३२ विकृतीनाम संवत्सरे मार्गशीर्ष शु॥ १ प्रतिपदा राजश्री सूर्याजी फिरंगोजी नाईक पिसाळ देशमुख प्रांत वाई सु॥ सन इहिदे अशर मया अलफ सन ११२० लिहून दिल्हें इनामपत्र ऐसाजे. प्रांत मजकुरची देशमुखी तुमच्या व आमच्या वडिलांची मिराशी तुह्मी आह्मी खात असतां दरम्यान न्याहारखान गोरीनें वतनांत खलेल केलें. मग तुह्मी वतनाकरितां कष्ट मेहनती करून वतन सोडविले. मग तुह्माआह्मामध्ये कथळा लागला होता. तो तुह्मी आह्मी बसोन तोडून तुह्मास निमे देशमुखीची महजर व वांटणी करून दिल्ही. त्याप्रमाणें आह्मी चाल चालवावी ती चालविली नाहीं. आह्मापासोन अंतर पडिलें व खाजेखानाचे कारकीर्दीमध्ये तुह्मापासोन बेदाव्याचा कागद लिहून बूधच्या मुक्कामास आणविला. ऐशी बहुत कांही अंतरें पडली. मग तुह्मी रागें भरून निंबाळकर व थोरात व राजश्री परसोजी भोसले आपल्यास सामील करून आह्माशीं कटकट केली. शेवटीं महाराज राजश्री राजा शाहू छत्रपती साहेबास देशमुखी दिल्ही. तुह्मी आह्मी वतनास तुटलों. महाराज साहेबांचे मुतालिक येऊन वतनावरी बैसोन वतन खाऊं लागले. वतन गेलें ऐसें जाहले. मग तुह्मी आह्मी बैसोन विचार केला जे :- तुह्मी येक होऊन वतन सोडून निमें निमें खावें. ऐसा विचार करून निमें देशमुखीचा महजर तुह्मास पेशजी करून दिल्हा होता. परंतु गोवी साक्षी कोणाची नव्हती मग महजर वांटणीच्या माहिती यावरी साक्षीही करून दिल्या. आणि हा कागद इन करून तुह्मास लिहून दिला आहे. याउपरी तुह्माशीं बेइमानी करणार नाहीं जो बेइमानी करील त्याचें श्री निसंतान करील. तुह्मी निमी देशमुखी खाऊन सुखरूप असणें. तुमचे निमेस आह्मी खलेल न करावें. आमचे निमेस तुह्मी खलेल न करावें. खाजेखानाचे कारकीर्दीस तुह्मापासोन कागद बेदाव्याचा लिहून घेतला होता तो कागद रद्द असे. हे सही.
शिक्का.
केशवजी नाईक बिन दत्ताजी नाईक देसाई.
कानोजी पिसाळ.
तानाजी लिंगोजी व गिरजी झिंगो देशपांडे
कृष्णाशेट शेटीया क॥ वाई.