Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मातुश्री पिलाबाई देशमुख हेही आपणास बराबरी घेऊन दर मोकाम तुळापुरास गेली. आह्माबरोबर देशकही होता. एक दोन वेळां फिरादिही केली. परंतु दरबारीं टकियावेगळें काम निघोन येत नाहीं, व न्याहारखान गोरीही जबरदस्त, आपणांसही वशिला कोणी नाहीं. कितेक दिवस दरबारीं होता. त्यावरी तुह्मी वतनाची खबर ऐकोन वतनाकरितां गळा कफणी घालून दरबारास गेलेती जुलपुकारखान बाहादूर याची भेटी घेऊन आपले वतनाचे कुल हकीगत जाहीर करून त्यास वशिला करून त्याचे हातें हजरतजील सुभांजीचे मुलाजमत केली. वतनाचे बाबें अर्जी पोहोंचविली. त्यावरी जुलपुकारखान किले रायरीस फत्ते करावयास रवाना केले. ते स्वार होऊन गेले. त्याबराबरी हजरत पातशहानिले बराबरी दिल्हे, की पातशाही काम याचे हाते घेणें. त्यावरी कितेका रोजानीं रायरी फत्ते केली. ते प्रसंगी तुह्मीं बहुत खस्त खाऊन पातशाही काम केलें. वतनाबद्दलही टक्का खर्च केला. त्यावरी जुलपुकारखान बहाद्दूर रायरीस फत्ते करून राजे अजमाचे कबिले व राजा शाहू याशी घेऊन तुळापुरास आले. तुमची आमची भेटीही जाहली. तुह्मी आपली हकीगत आह्मांस सांगितली. आह्मी जे जे मेहेनती केली तेही तुह्मास सांगितलें. ऐशियास टक्का असलिया वेगळे वशिला होऊन दरबारीहून काम निघोन येत नाहीं. आमचा जो विचार आहे तो तुह्मांस दाखल आहे. तरी तुह्मी खानबहाद्दूराबराबरी मेहेनती करून आला आहा. तरी वतन तुह्मा भावाचें आहे. न्याहारखान गोरी जबरदस्त आहे. त्यापासून वतन सोडिलें पाहिजे. जो टक्का लागेल तो साहूकाराचा काढून दरबारी खर्च करून एकवेळ वतन सोडवणें. वतन बहाल जाहलियावरी तुह्मी आह्मीं वतन सामीलपणें खाऊन. तुह्मी दौलतेवरी नजर देऊन वतनाची सांडी कराल तरी दौलत दो दिवसाची आहे. वतन तुमचे आमचे वडिलांचे आहे, तें सोडविलें पाहिजे. आतां तुह्मी पातशहाचे मुलाजमतीस जाल ते प्रसंगीं आधी वतन बहाल करून घेणें. मग दौलत मनसबा जे होईल ते हो. त्यावरी तुह्मी मातुश्री पिलाबाई व गंगाजी नाईक याचा निरोप घेऊन गेलेती. खानबहाद्दराचे मारफतीनें हजरतजील सुभांजीचे मुलाजमत जाली. खान बहादूरांनी तुमचा मजुरा केला. ते वक्तीं हजरत बहुत मेहेरबान होऊन जालेखान बहाद्दुरानें अर्ज केला कीं, न्याहारखान गोरी फोउजदार याणें गैरवाका मालूम करून वतनास दाखल जाहला आहे. तो कांही वतनास पोहोंचत नाहीं. तर त्यास तगीर करून याचे वतन यास बहाल करून दिल्हे पाहिजे. त्यावरून न्याहारखान फौजदार यास तगी करून दुसरा फौजदार पाठवून दिल्हा. वतन आमचे आह्मांस बहाल केले. व साहा हजारी मनसब ही दिल्हे. त्यास तुह्मी हजरतीस अर्ज केला कीं, माझें वतन मज बहाल केले हेच माझी मनसब. ऐसा अर्ज करून वतन बहाल करून घेतलें. मनसब कबूल केली नाहीं. मग हजरत बहुत मेहेरबान होऊन वतनाचे बहालीस हुकूमही दिल्हे. व देशकास ही शिरपाव घ्यावयाचा हुकूम सजावाल दिल्हा. तेथून तुह्मीं डेरियास येऊन आह्मांस वर्तनाम सदरहू सांगितलें. त्यावरून खुशालीचे शक्कर वांटली. दुसरे रोजीं आह्मांस व देशपांडियास व देशकयास शिरपाऊ पातशाई कचेरीस दिल्हे. यावरी बाहालीचे परवाना कदीम सनद सनदेचे पुरसीस केली.