Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
यावरी सनदा हजीर नव्हत्या. त्या आणावयास माळेस पाठविलें. इतकियांत लश्कर कुच करून हजरत बेदरास चालिले. त्यावरी कदीम सनदा ही आणिले. सनदा बमोजीब हातांनी सनद करून घ्यावी. त्यास लश्कर मजल दरमजल चालिले. अकोळजेच्या मुक्कास लश्करें गेलिया दुसरे रोजीं मातोश्री पिलाबाईस वर्तमान देसकास वाईस जावयास रजा दिल्हे. तेथून लश्करा बराबरी तुह्मांस व देशपांडियास वतनाचें सनदपत्र करून आणावयास कदीम सनदा बरोबरी देऊन पाठविलें. त्यावरी तुह्मीं दरबारी वरीस दीडवरीस राहून पातशाही परवाना देशमुखीचा करून घेतला. दामोहस्जबदूलमुलूक नबाब असतखान दिवाणसाहेब त्यावरी दरबारी टक्का मोबलगा खर्च जाहला. साउकाराचे टकियाचे फरीखत जालिया वेगळे सनदा हातास न येत, याबद्दल पैका आणावयास माळेस वाईस मातोश्री पिलाबाईजवळी पाठविली. त्यास तेही परगणेमजकूरपैकी शिस्त करून रुपये २५०० अडीच हजार पाठविले. ते दरबारीं चोपदार वगैरे किरकोळ खर्च जाहला. त्यास ही पुरलें नाहीं. फिराऊन मागती माळेस टकिया पाठविली तों वाटेस खबर जाहीर जाहली कीं, गनिमानें वाइचें ठाणें उठविलें. मग तुह्मास साउकारांनीं टकियाबद्दल जेर जप्तकरून तगादा लाविला. मग तुह्मीं साउकाराचे घरीं गुंतोन राहिलेती त्यावरी कितेक दिवसांनीं तुह्मी वाईस आलेती. मग आह्मास बोललेत साउकाराचे टकियाचें काय करिता? तुह्मी उपराळा केला नाहीं. त्यामुळें आमची खराबी जाली. सत्यानास जाला. आह्मी साउकाराचे घरी बंदीस पडिलों. असें कितेक तुह्मी आपली मेहेनती सांगितली त्यावरी तुमची आमची बोलाचालीहीं बहुत जाली. शेवट मनास आणितां साउकाराचा टक्का मोबलग खेरीज, जाली टक्का तो साउकाराचें देणें जरूर. आण नातवानगीचा वक्त आपला व मुलुकाचा ऐवज कोठें दिसोन नये. यामुळें तुमचे व आमचे कुसूर वाडोन वतन तिसरियाचे हातास जावें ऐसा पदार्थ दिसोन आला मग तुह्मी बसोन विचार पाहतां वतनाचे खर्चाचे टक्का हस्तकबिन तगाईत तगीरी न्याहारखान गोरी येकूण रुपये १२२७०० येक लक्ष बावीस हजार सातशे रुपये दरबारी मुद्दल खर्च जाहला. त्यास व्याजवर्ताळा साउकारी हिशेब चौरात्रा पंचोत्रा प्रे॥ हिशेब करून पाहिला. तो बेरीज बोबलगा जाली. मग तुह्मी आह्मी बापभाऊ; वतन तुमचे आमचे वडिलाचे भाकरी ही राज्याचे हातास गेली होती ते सोडऊन आपले घरास आणिली. तुह्मास परमेशरें फुरसती दिला ह्मणून वतनाचा उध्दार केला तरी तुह्मी भाऊच आहा बिराजी असतेस तरी टाकियापैकियाचा हिशेब मानतेस. तरी तुह्मा आह्मांत बिराजपण नाहीं. तुमचा आमचा वंश एकच आहे. याकरितां आह्मी आपले संतोषें प्रांत मजकूरची देशमुखीपैकी निमे देशमुखी तुह्मास दिली असे. त्याचे वाटणी जाबिता आलाहिदा करून दिल्हा असे. त्याप्रमाणें निमे देशमुखीं तुह्मी लेकराचे लेकरीस खाऊन सुखी असणें. सदरहू टक्का तुमचे गुजरातीनें साउकाराचे कर्ज वतनवारी जाले, त्याशी आह्मास निसबती नाहीं.