Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

२४. बाजीराव व फत्तेसिंग ह्यांच्या मनांत एकमेकांविषयी यद्यपि विकल्प आलेला होता, तत्रापि त्यांनीं एकमेकांविरुद्ध झुंझण्याचा उद्योग आरंभिला नाहीं. बाजीरावाच्या इतर प्रतिस्पर्ध्यांची गोष्ट याहून निराळी होती. कोंकणांतील आंग्र्यांनीं, गुजराथेंतील दाभाड्यांनीं, व-हाडांतील भोंसल्यांनीं व कोल्हापूरच्या राजांनीं शाहूच्या व बाजीरावाच्या विरुद्ध युद्धप्रसंग केलेले इतिहासांत विदितच आहेंत. ह्या युद्धप्रसंगांची मूळ कारणें, व जवळचे व दूरवरचे परिणाम, ग्रांटडफनें आपल्या इतिहासांत दिलें नाहींत. कारणें व परिणाम ह्यांचे खुलासे सुज्ञ वाचकांनीं आपले आपणच करून घ्यावे अशी डफची प्रतिज्ञाच आहे ( Duffs History, preface ). डफची दुसरी प्रतिज्ञा अशी आहे कीं, इतिहासांतील प्रसंगांचे खरेखुरे, तपशील देण्याला मात्र आपल्याकडून कसूर होणार नाहीं. पैकीं ह्या दुस-या प्रतिज्ञेंत कितपत अर्थ आहे ह्याचा खुलासा मी वारंवार करीत आलों आहें. ग्रांट डफचा तपशील अनेक ठिकाणीं विश्वसनीय व प्रमाणबद्ध नसतो ह्या विधानाची सत्यता सिद्ध होऊन चुकली आहे. कारणें व कार्ये ह्यांची जी ही ग्रांटडफनें ताडतोड केली, तीच त्याच्या विपत्तीच्या मूळांशी आहे. कारण व कार्य ह्यांचा घटस्फोट करून इतिहास लिहूं पहाणें अशास्त्र आहे इतकेंच नव्हे, तर तें अशक्य आहे. अनेक कार्ये पुढें आलीं व त्यांतून आधीचीं कोणतीं, मागूनचीं कोणतीं व समकालीन कोणतीं ह्याचा उलगडा करण्याचा प्रसंग आला, म्हणजे मग कारणांचे महत्त्व कळूं लागतें अशा प्रसंगी कारणांकडे पाहिलेंच नाहीं, म्हणजे डफच्या इतिहासासारखा इतिहास तयार होतो. कारणाशिवाय कार्याचे वर्णन देईन हें म्हणणेंच मुळीं असंबद्ध आहे. आश्चर्य हेंच कीं, तें जगापुढें मांडण्यास हा लेखक तयार झाला.

२५. कार्यकारणांची ताडतोड केल्यामुळें ग्रांट डफला मराठ्यांच्या इतिहासाचें रहस्य बिलकुल कळलें नाहीं व कालाचा निर्णय बराबर न केल्यामुळें सामान्य अशी गोष्ट जी कालाचें पौर्वापर्य तेंहि समजलें नाही, ह्या प्रकरणाचा विचार येथपर्यंत केला. आतां ह्यापुढें १७४० पासून १७६१ पर्यंतच्या मित्यांसंबंधानें माझें म्हणणें काय आहे तें सांगतों. १७५० पासून १७६१ पर्यंतचे तक्ते पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेंत मीं दिले आहेत. तिस-या खंडांतील पत्रांचा विचार करतांना १७४० पासून १७५० पर्यंतच्या अवधींतील प्रसंगांचा ऊहापोह करावयाचा आहे, त्यावेळीं ह्या अवधींतील मित्यांचाही छडा लावतां येईल.