Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

२२. बाजीराव, चिमाजीअप्पा व फतेसिंग भोसले यांच्या स्वा-या व त्यांच्यासंबंधानें ग्रांटडफनें केलेल्या चुका ह्यांचे स्पष्टीकरण येथपर्यंत झालें. आतां हे तीन पुरुष १७२० पासून १७४० पर्यंत कोठकोठें होते ह्याचे तक्ते पुढें देतों, म्हणजे हें स्पष्टीकरण जास्त पूर्ण होईल.

तत्क्ता पहिला : बाजीराव बल्लाळाच्या हालचालींचा तक्ता.
तक्ता दुसरा : चिमणाजी बल्लाळाच्या हालचालींचा तक्ता.
तक्ता तिसरा : फत्तेसिंग भोसल्याच्या हालचालींचा तक्ता.

२३. ह्या तीन तक्त्यांपैकीं बाजीराव बलाळाच्या हालचालींचा तत्क्ता १७२० पासून १७४० पर्यंत सबंध भरला आहें कोणत्याहि वर्षाच्या सप्टंबरापासून जुलईपर्यंत बाजीराव कोठें होता हें ह्या तक्त्यावरून स्पष्ट कळून येतें. चिमाजीअप्पाची १७२३ पासूनची हालचाल दुस-या तक्त्यांत दिली आहे, व तिस-या तक्त्यांत पत्तेसिंगाच्या हालचालींचा नुसता सालवारीनें निर्देश केला आहे. बाकी राहिलेल्या सरदारांच्या हालचालींचा पता अद्याप संगतवार तर लागला नाहींच; परंतु कांहीं अपवाद खेरीजकरून अमुक सरदार अमक्या स्थळीं अमुक वर्षी होता असें निश्चयानें म्हणण्यापुरतीहि माहिती मिळालेली नाहीं. ह्या शकावलीपासून फायदा एवढाच झाला आहे कीं, १७२० पासून १७४० पर्यंतच्या पेशव्यांच्या हालचालींच्या मित्या तेवढ्या बिनचुक मिळाल्या आहेत. अमुक मोहिम अमुक महिन्यांत सुरू झाली एवढें ह्या मित्यांपासून समजतें. ह्यापेक्षां जास्त माहिती ह्या शकावलीपासून मिळणार नाहीं. मोहिमांचीं विशिष्ट कारणें, मोहिमांवर गेलेल्या सैन्याची संख्या, मोहिमांचे टप्पे, मोहिमांत झालेल्या युद्धांच्या स्थलांचीं नावें, युद्धांची तपशीलवार हकीकत, मोहिमा संपल्यावर झालेल्या तहनाम्यांच्या नकला वगैरे बाबींची उपलब्धि अद्यापि व्हावयाचीच आहे. ग्रांटडफच्या ग्रंथांतहि ही माहिती बहुतेक बिलकुल नाहीं. हें शेवटलें विधान किंचित् जास्त खुलें करून दाखवितों. १७२६ तील श्रीरंगपट्टणच्या स्वारीच्या माहितीचा आदि, मध्य व अंत्य डफनें येणेंप्रमाणें केला आहे:--- In 1726 the पेशवा was with a very large army under फत्तेसिंग भोसले, which proceeded into the Carnatic, plundered the Districts, and levied a contribution from श्रीरंगपट्टण. ह्या वर्णनांत खालील दोष आहेत. (१) ह्या स्वारीला कारण काय झाले तें दिलें नाहीं (२) ह्या स्वारीला मुळीं कारणच कांहीं नसावें असा एकंदर वाक्याचा बोध होतो. (३) मोठें सैन्य म्हणजे किती मोठें ह्याचा कांहीं एक अंदाज होत नाहीं. (४) कर्नाटकांत पूर्वेस कीं पश्चिमेस सैन्य गेलें ह्याचा पत्ता नाहीं. (५) लुटणें हा शब्द वापरून मराठ्यांच्या संबंधीं तिरस्कार व्यक्त केला आहे. (६) Districts म्हणजे प्रांत कीं संस्थाने ह्याचा निर्णय केला नाहीं. (७) Levy शब्द घालून मराठ्यांचा जुलूम व्यक्त केला आहे. (८) १७२६ हा आंकडा घालून स्वारीची खरी मिति चुकविली आहे. आतां ह्या स्वारीचें खरें कारण असें आहे. १७२० पासून निजामावर मराठ्यांच्या स्वा-या एकसारख्या चालल्याच होत्या. त्यात १७२२ त व १७२३ त निजामुन्मुलुख किंवा त्याचे सरदार कर्नाटकांत अर्काट, त्रिचनापल्लीवर जाणार अशी बातमी आली.