Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

नारायणराव वकील औरंगाबादकर                                                लेखांक ६७.                                                         १७१४ पौष शुद्ध ११.
यांचे नावे पत्र कोनेर बाबूराव याजविसी
रा छ ९ जावल सन १२०२.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारायणराव स्वामीचे सेवेसी--
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें स्वकुशल लिहित आसावे विशेष कसबे कनड वगैरे देह पांच एथील कुळकर्ण राजश्री सिवराम माहादाजी व खंडेराव कोनेर यांचे त्यास अजीमुदौला बाहादूर याचा खासगत ऐवज येणे होता सबब त्याणी कुळकर्णाची जप्ती करून ऐवज घेऊन जमीदार व आमीलास बरखास्त दिल्ही या संधीत त्यांजकडील सुभेदारीचें काम दूर होऊन आहसनुदौला याजकडे काम आलें याजमुळे जप्ती तसीच वहिवाटींत आली जप्ती कांहीं एथून सरकारांतून नाही याजकरिता सांप्रत नवाब आजमुलउमरा बाहादूर याणी सुभ्याचे नावें पत्रे दिल्ही आहेत त्यास उभयताकडोन पत्रे घेऊन तुह्मांकडेस कोन्ही कनडेहून येतील त्यास सुभेदारास पत्रे नवाब मवसुफ व आमची आहेत हे देऊन जाबसाल उगऊन कुळकर्णाचे वतनाची बरखास्त करून द्यावी व पा कनेड एथील देशमुख व देशपांडियेपणाचे गुमास्तगिरीचें काम राजश्री कोनेर बाबूराव यांजकडे याचे तर्फेने माहालीं शाहाजी पा कामावर त्यास आजपावेतो नवाब अजीमुदौली बाहादूर यांचे आमलांत उपद्रव नाहीं सांप्रत पहिले गुमास्ते तेथे येऊन कुचष्टा करून सुभेदार यांचे सजावले पाटील मजकुरावर पाठऊन शंभर रुपये रोजाचे घेतले आणि सजावलास बरखास्त दिल्ही नाही ह्मणोन वर्तमान त्याजवरून हें पत्र लिहिलें असे की मारनिले आमचे पदरचे असे अस्तां हे सुभेदार याणी एकाचे सांगितल्यावरून करणे ठीक नाही याजकरितां तुह्मी नवाब आहसनुदौला बाहादूर यासी व राजश्री बाळाजी नाईक यांसी बोलून व आह्मी उभयतास पत्रे लिहिली आहेत हे देऊन शंभर रुपये रोजा बा माघारें देवऊन सजावलास बरखास्त देवावी व पो यांसी कोण्ही काविष न करीत तें करवावें र।। छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.