Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
गोविंदराव कोकाटे मोकासी बसिर. लेखांक ६४. १७१४ पौष शुद्ध ११.
कर यास पत्र सदासीव भटोजी
आमील पा मार यांजपासी दिल्हे
छ ९ जावल.
राजश्री गोविंदराव यशवंतराव कोकाटे गोसावी-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्रो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष पा बासर एथील जागीर कसबे मार वगैरे देह नऊ एथील राजश्री बद्रीनाथराव हरकारे यांची तेथील मोकासा मामुल प्रा तुह्मांकडे दरसाल फडच्या करून देत असतां सन ११९५ सालापासोन फडच्या करून घेऊन कौल हुजती मारनिलेस देत नाही व दस्तऐवजा प्रा वर्तणूक होत नाही ह्मणोन समजलें त्यावरून लिहिलें असे त्यास सुदामत पेशजीपासोन मामुल चालत आल्याबमोजीब फडच्या करून घेऊन कौल रसीदा सालोसालच्या सन ११९५ पासोन द्याव्या सेरी व तहरिरीचा जाबसाल माहली पंच्याणव सालापूर्वी तुमचा व जागीरदाराचा चालत आल्या प्रा चालावे गैरवाजवी दिकत करणे नीट नाही याउपरि सुरळीत फैसला मागील होऊन पुढें मामुल प्रा सन १२०२ सालचा फडच्या करून घेऊन सालोसाल कौल हुजती देत आल्या प्रा द्याव्या बोभाट नसावा आमल आलीयावर तालुक्यांत उगीच खटला होऊ नये रा छ ९ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.