Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

सैद मुजवरखान आमील पा                                                          लेखांक ७०.                                                         १७१४ पौष शुद्ध १३.
वसमत याचे दरखास्ते प्रो
बळवंतराव लक्ष्मण सेळूकर
याचे नावे पत्र रा छ ११ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बळवंतराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें स्वकुशल लिहित आसावें विशेष सैदमुजवरखान याणी हाजरत बंदगानआली यांस अर्ज केला की पूर्वी मौजे वाकली पा नांदेड हा गांव मोकासदाराकडे स्वराज्याचे वाट्यास आहे तेथील मामलेदार याणी खटला करून वसमत परगण्याचे कितेक गांवची खराबी केली तेव्हां वसमतकराची व टांकलीकराची पंच्यायत नांदेडांत पडली ते समई बळवंतराव सेळूकर यांजकडील राघोपंत व रामचंद्रपंत यांचे विद्यमाने फैसला जाला या प्रसंगात माद अमीरबेगखान आमील नांदेडकरहि होते तेहि प्रस्तुत हाजर आहेत असे अस्तां सांप्रत टाकलीकरानी जमेयत जमा केली व करितात याउपरि वसमत परगण्यांत हा गांव करणार त्यास एविसीचा बंदोबस्त जाला पा ह्मणोन त्याजवरून हाजरत बंदगानआली याणी माद अमीरबेगखान यांस आह्माकडे पाठविलें व सैदमुजवरखान यांचे अर्ज केल्या प्रोहि मार सांगून पाठविला की मागे जाले त्याचा फडच्या बळवंतराव कारभारी यांचे विद्यमाने जाली हाली टांकलीकर जमाव करून वसमत परगण्यात हा गाव करणार हे ठीक नाहीं वसमत माहाल हा आमचा खालसा आहे याजकरितां त्यास लेहून मना करावें त्याज वरून हे पत्र लिहिलें असे की पहिली माहीतगारी तुह्मांस आहेच त्यास टाकलीकरास ताकीद करावी की याउपरि वसमत मुरगण्यासी खटला न करावा व पुन्हा येविसींची नालष येऊ न द्यावी खटला केल्यांत तर्फेने नुकसानी आहे रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.