Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला चैनापटणकर याचें लेखांक ६३. १७१४ पौष शुद्ध १०.
पत्राचें उत्तर र।। छ ८ जावल.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावी यास-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्त्री गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष पेशजी तुह्मी तीन वेळा पत्रे पाठविली ती पावली पुण्यास रवाना केली त्याची उत्तरें एथून आह्मी छ ११ र।।खरी टप्यावरून रवाना केलीं आहेत त्यावरून कळेल हली तुह्मा कडोन । पत्रें आली छ २७ रबिलावलचें छ १९ राखरी पावलें व छ ८ रबिसानीचे छ १९ मिनहून पावलें पत्रे व अखबारा पुण्यास रवाना केल्या उत्तर आल्यानंतर रवाना करण्यांत येतील यानंतर तुमचे लिहिण्यांत की आपले यादी प्रा सर्व सरंजाम सिद्ध आहे मागाहून रवाना करण्यांत येईल त्यास सरंजाम लौकर रवाना करावा व त्याजबराबर तीन जोड्या मर्तबानाच्या चिनीच्या वरती झांकणी कुलाबेदार कुलफी मजबूत एणे प्रा घेऊन सदरहू जिनसा बराबर रवाना करावे.
२ मर्तबानची जोडी १ आंत दीडसेर जिंनस मावे असे दोन
२ मर्तबानची जोडी १ आंत सेरभर जिंनस मावे असे दोन
२ मर्तबानची जोडी १ आंत आधसेर जिंनस मावे असे दोन
----
६
साहा मर्तबान चांगले घेऊन पाठवावे तुह्मी नीम अस्तीनीचा मार लिा त्यास तुमचे सांगण्यांत आले नवतें हली समजलें याउपरि तयार करावयास येईल चंगेरे दोन फुलें ठेवावयाचे जालदार लोखंडी रोगन केलेले २ व विलायती सफेद तांब्याच्या दोन चंगेर दोन एकूण च्यार चंगेरदान जरूर पाठवावे अलीकडे तुह्माकडून बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर वरचेवर पत्र पाठवीत जावे रा छ ८ जावल बहुत काय लिहिणें हे आसिर्वाद.