Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जाब व रसीद मिळून पत्र कोनेर लेखांक ६२. १७१४ पौष शुद्ध ९.
हरि यास छ ७ जावल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कोनेरपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार, विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष तुह्मी छ २६ माहे राखरचे पत्र पाठविले ते छ १ माहे जमादिलावली पावले यात्रेत पोहचला मागाहून राजश्री तिमाराव याणी ऐवज पाठविण्याची निकडहि लिहिली त्यावरून पंधरा हजाराच्या तूर्त हुंड्या पुण्यावरील पाठविल्या ऐवज घेऊन रसीद पाठवावी बाकी ऐवजाच्या हुंड्या सत्वरच रवाना करितों ह्मणोन तपसीले लिो ते कळले त्यास एथे ऐवजाची निकड भारी एकंदर ऐवज झाडून पाठवावयाचा होता ते न करितां पंधरा हजाराच्या मात्र हुंड्या पाठविल्या त्यास हुंड्या सुमार आठ पुण्याच्या रु।। १५००० पंधरा हजार पैकीं वजा हुंडणावल हैदराबादी ऐवज घ्यावयाचा करार सा दर सो दोन का प्रो पुण्याची हुंडणावल का तीनसे बाकी रुपये १४७०० चवदा हजार सातसे सदरहू रु।। मा।। व्यंकटीदास भुकनदास पावले आसत आणखी ऐवज तुह्मी देणे आहे त्यास लवकर हुंड्या पाठऊन देणे विलंबावर पडू नये जोती जासूद ऐवजाकरितां तिमाराव यांचे समागमे दिल्हा आहे ऐवजाची निकड आसे तर झाड्यानिसी ऐवजाच्या हुंड्या लवकर पा रा छ ७ जावल सलास तिसईन सन १२०२ फसली बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.