Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

भीमराव श्रीपत करनुलकर यांचे                                                    लेखांक ४५.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य ४.
पत्राची उत्तरें रा छ १७ राखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणें विशेष तुह्मी छ ३ राखरचे पत्र पा ते छ ७ माहे मारी पावले नवाब माद रणबस्तबान बाहादूर याचा छ २७ रावलीं यमे प्रहर दोन घटिका रात्र गेल्यानंतर इंतकाल जाला याजपूर्वीच सावध अस्तां नवाब माद अलफखान बाहादूर यांस सर्व सोंपून दिल्हे त्याचा विस्तारें मोर नवाब माद रणदुलाखान बाहादूर याणी नवाब अजमुलउमेरा बाहादूर व मीर अलम बाहादूर व आपल्यास लिहिला आहे त्यास यांची आपली बिरादरी त्या अर्थी या प्रसंगी सर्वश्रीं साहित्य केले पाहिजे व पुण्यासहि पत्रें लेहून तिकडोनहि पत्रें आणवावीं इत्यादिक मजकूर विस्तारें लिहिला तो सर्व समजला ऐसियास नवाब मरहुम यांचा इंतकाल होणे मोठी गोष्ट वाईट जाली थोर उमदा सरदार व ज्यांहादीद होते याचा आपसोस आह्मास फार जाला तो विस्तार काय लेहावी आसो ईश्वरसत्तेस उपाय नाहीं तुह्मी आमचे तरफेने नवाब महमद अलफखान बाहादुर यांची तषफी व दिलज्याईं करावी आह्मी एथून नवाब महमद रणदुलाखान बाहादुर यांचे पत्राचें उत्तर लिहिलें व नवाब माद अलफखान बाहादुर यांस मामतीचें पत्र व रक्थीपात दुषाला सफेद पा आहे तुह्मी जाऊन पत्र देऊन दुषाला द्यावा व विस्तारे मार एथून पुण्यास लिहिण्यांत आलाच आहे अजमुलउमरा बाहादुर व मीर अलफ बाहादुर व राजे धरमयंत याणी पत्राचे जाब माद रणदुलाखान बाहादुर यांस लिहिले आहेत त्याजवरून समजले असेल माद अलफखान बाहादुर यांचे साहित्यविसीं आह्माकडोन किमपि अंतर व्हावयाचे नाहीं प्रसंगोचित सर्व घडेल येविसीं चिंता नाहीं तुह्मी वरचेवर तेथील प्रसंगाचे वर्तमान लिहित जावें रा छ १७ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.