मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

पत्र नागोपंत चिनापटणास                                                          लेखांक ४३.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य २.
नारायण भट तेलंग राजेश्री नाना कडील
यांनी मागितले त्यावरून दिल्हे छ १५ राखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नागोपंत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहीत जावे विशेष राजश्री नारायण भट बीन लिंगन भट वगैरे चेरूवारू कारचेर उमर सरकार मुर्तिजानगर याची व मलपराज कोनवारू या उभयतांचा कजिया को मारचे कुलकर्णाविषईं लागला आहे त्याजवरून नारायण भट याणी राजश्री नाना यांस विनंति केली कीं आपण सर्व अधिकारी मलपराज मार यास आपण आणून ठेविला कुलकर्णाचे लिहिण्यास कारकून ठेऊन कांहीं दिवस वहीवाट केली पुढें कोनवारू मार सदरहु वतन आपले ह्मणून लागला ऐसी यास को मारी इंग्रजाकडील अमील मेस्तर ऊंस आले त्याणी उभयतांचा कजिया मनास आणून चेरूवारू यांचे वतन याजकडे चालते केले पुढे दुसरे अमील को मारी कांकरेल आले त्याणी कोनवारू याजकडे चौकसी न करता कुलकर्णाचे वतन चालते केले येविषईं स्वामीनी इंग्रज याजकडील आमीलदारास ताकीद करऊन आमचे वतन आह्माकडे चाले सुदामत प्रा ते करवावे त्यावरून राजश्री नानानी मेस्तर मालीट यांस सांगून त्यांचे पत्र हालीचे कमाविसदार चेटलो यांजला देविले आहे व राजश्री बहिरोपंत याणीहि तुह्मास पत्र लिहिले आहे त्याप्रो चेटलो यांस ताकीद करऊन नारायण भटजीचे वतन यांचे याजकडे चालते करवावे मेस्तर किनवी यांचीहि पत्र येविषईं देविली आहेत रा छ १५ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries