मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                             लेखांक ४६.                                             १७१४ मार्गशीर्ष वद्य ४.

पुा राजश्री भीमराव स्वामीचे सेवेसी-
विनंति उपरि स्वामीचे पैसे लवकरच पावत आहेत रुपये घरामध्यें आहेत ह्मणोन जाणावें सेवक पदरचा आहे स्वामीचे रुपये स्वामीस पावत आहे यास धोका नाहीं सेवकाने स्वामीचे नुकसान करणार नाहीं सत्य समजावें इत्यादिक तपशील लिहिला तो समजला ऐसियास बाळाजी व्यंकटेश एथून ऐवजाकरितां तेथें आलेत त्याचे येण्याचे तुह्मी एक अक्षर लिहिले नाहीं व त्याचें पत्रहि घेऊन पा नाहीं तेव्हा काय समजावें मारनिले तेथें आलेत किंवा नाहींत तुह्मी मात्र धातुपोषण करून ऐवजाचे लिहिता की ऐवज घरांत आहे धोका नाहीं त्यास हा कोठील अर्थ याउपरि ऐवज लौकर रवाना करावा तुह्मासहि तेथील स्वभाव गुण लिहिण्याचा लागलासा वाटतो धातुपोषणाच्या गोष्टी आजपरियंत सदैव तुमचे पत्रात लिहिल्यांत येतात अनुभव कांहींच नाहीं हे बहुत आश्चर्याची गोष्ट बाळाजी व्यंकटेश यांस पत्र लिहिलें तें पावते करून उत्तर पाठवणे रा छ १७ राखर हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries