मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

नाथूराम चौधरी याचे मागितल्यावरून पत्र.                                    लेखांक १९४.                                                      १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.

राजश्री राजे सदाशिव रड्डी बाहादूर देसाई सरकार मेदक गोसावि यासि-
5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावें विशेष सुरजमल मारवाडी हे सरकार श्रीमंत राजश्री याचे बाजारचे बेपारी याची दुकान पेठ संगारही ता मेदक एथें आहे यांचे देणे घेणे लोकाकडे पेठेत व आसपास गांवगना आहे लोक देण्यास हिलेहरकत करितात त्यास ताकीद करून वाजबी हिसेबप्रो देवावें व यांचे हरएकविसी साहित्य करीत जावें यांचे भाऊ जैगोपाळ एथे आमचे बाजारात आहेत यांचे हरएकविसी साहित्य केल्यांत आमचा संतोष रा छ २९ साबान बहुत काय लिहिणे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries