Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सखाराम अनंत याणी पत्रे मागितली लेखांक १९६. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
सबब सैदमुजवरखान यास.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सैदमुजवरखांबाहादूर सलामत
अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरअफीयत. जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून पा मुदखेड व अर्धापुर एथील सरदेशमुखीची मामलत राजश्री रंगो प्रल्हाद यांजकडे आहे त्यास सन १२०० साल पो बाकी च्यारसें पस्तीस रुो राहिली व सन १२०२ सालचा अमल दरोबस्त येणे त्याचा फडच्या जाला नाही ह्मणोन कळलें त्यावरून लिा असे त्यास बारासें सालची बाकी व सालमारचा अमल सदरहू ऐवज मारनिलेकडे फडच्या करून रसीदा पाठवाव्या साल गुजरून गेलें याउपरि मामलतीचे ऐवजास दिवसगत लागोन बोभाट न ये तें करावें रा छ २९ साबान ज्यादा काय लिहिणे.