Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
मातुश्री चिमोबाईस पत्र १ बारामतीचे लेखांक १९५. १७१५ अधिक वैशाख शुद्ध १.
डांकेवर छ २९ साबान.
तीर्थस्वरूप मातुश्री चिमाबाई वडिलाचे सेवेसी-
अपत्य बापूचे सां नमस्कार विज्ञापना ता चैत्र वद्य १० पावेतो मुा भागानगर एथे सुखरूप असो विशेष तुह्मी बारामतीस आलियाचे वर्तमान ऐकिलें संतोष जाहला पूर्वी तुझी पुणियास असतां एक पत्र पाठविले ते पावले न पावले हे कळले नाही बारामतीहून आह्माकडे तुह्मी येणार ऐसे ऐकिले त्यास प्रस्तुत नवाबाची स्वारी निघाली आह्मासहि त्याजबरोबर निघणे प्राप्त त्यास या समयात तुमचे येण्याची सोय नाही आमचेच येणे तिकडे होईल असे आहे कदाचित आमचे येण्याचा योग न जालियास तुह्मास येण्याविसी लिहून पाठऊ तेव्हां यावे तीर्थस्वरूप सौ आकाबाई यांचे शरीर बहुत अशक्त जाले आहे स्वकीय कळकळीचे मनुष्य त्याजवळ समाचार घेण्यास प्रस्तुत कोणी नाही त्यास या प्रसंगी तुमचे येणे जाले तर वडीलपणे तुह्मी आकाबाई यांचा समाचार घ्यावा हे योग्य आणि याजमुळे मला विश्रांत वाटेल आत्मीय मनुष्य प्रसंगास जवळ असावे असा नवस करावा लागतो ते गोष्ट तुमचे येण्यामुळे अनायासे प्राप्त जाली मी तेथे नाही याजकरितां तुह्मास लिहिले आहे इतके मनात येऊन लिहिल्याप्रमाणे करावे रा छ १९ अधिक शुद्ध १ हे विज्ञापना.