Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १८७. १७१५ चैत्र वद्य १३.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री माहादाजीपंत स्वामीचे सेवेसी-
सेवक गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष राजश्री अमृतराव लक्ष्मण टकले औरंगाबादकर याणी वर्तमान सांगितले कीं पूर्वीपासोन मौजे गणोरी पा सुलतानपूर पैकी सालाबाद आंबे मुरंब्यास दाणे शुमार ५० पनास आह्मास पावत असतात व एक कबाड गवताचे मोहदरीचे कुरणापैकी पावत असते ते हाली पावत नाही आपले पत्राचा आक्षेप करितात त्याजवरून हे पत्र लिहिलें असे की मारनिलेस पन्नास आंबे मुरब्याचे दाणे शुमार ५० व एक कबाडाची परवानगी मोहदरीचे कुरणात देऊन चालवावे पहिले पावत असेल त्याप्रा द्यावें रा छ २५ साबान सलास तिसईन मया व अलफ हे विनंति.