Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सदासीव नाईक खासबरदाराचे लेखांक १८३. १७१५ चैत्र वद्य ५.
याचे मागितल्यावरून पत्रें दोन
गवळ्याकरितां दिल्ही रा छ १९
साबान सन १२०२.
खांसाहेब मेहरबान दोस्तान सिदीइमामखानबाहादूर दाममोहबतहू गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर सला जाणून साहेबी आपली खयेरीत हमेषा कलमी करीत असिलें पाहिजे दिगर मजमून की को चिटगोपें एथे माहादजी गौळी सर्वत्र गौळी यांचा गुरु होता तो लावलद लेकीन हिलेहायात असतां मुतबना पुत्र सर्व गोत व कसबेकर जमीदार व मोकदम यांचे साक्षीने घेतला त्यास बाळू गौळी याचे ह्मणे की मजला आधी घेतले ह्मणोन दोघांचा वाद पडला आहे याजकरितां आपणास हे पत्र लिहिलें आहे की याची माहीतगारी तेथील गौळी व जमीदार व मोकदम व पटवारी वगैरेस असेल ते दर्याफ्त करून मुफसल लेहून पाठवावें रा छ १९ साबान ज्यादा काय लिहिणे.