Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक १८५. १७१५ चैत्र वद्य ५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहिणे विशेष राजश्री राजे धरमवंतबाहादूर याणी वर्तमान सांगितले की मौजे वाघी तर्फ सुगांव पा नांदेड हा गांव आमचे पुत्र राये केवलकिषन यांस जागीर आहे तेथील चौथ बाबती व सरदेशमुखी व सावोत्रा यांचा फडच्या मामुलाप्रो सन १२०२ सालचा करून देऊन रसीदा घेतल्या त्या बजीनस हाजर आहेत असें असतां हरघडी गांवास स्वार प्यादे नसतां बाहाना व सबब लाऊन पाठऊन गांवखर्चाखालीं आणितात त्यास येविसीं आपण पत्र ल्याहावें त्याजवरून हे पत्र लिहिलें असें की सन १२०२ सालचा फडच्या मामुला प्रों करून दिल्हा असतां मग गांवास स्वार प्यादे उगाच बाहाना करून पाठऊन गांवखर्चाखाली आणे हे ठीक नाही हे नवाब बंदगानअली याचे सरकारचे मुतसदी रात्रंदिवस नालषी करितात व रसीदा दाखवितात याचा परिहार कोठवर करावा त्यास याउपरि मौजे मारास उपद्रव न करितां हरएकविसी यांचे अमीलाचे साहित्य करीत जाणे ह्मणोन तीन पत्रे छ १९ साबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.