Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

गोविंदराव रघुनाथ अमील पाा                                                      लेखांक १७९.                                                      १७१५ चैत्र वद्य ४.
पालीम यांचे पत्राचे उत्तर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्मी पत्र पा ते पावलें तुह्माकडे सरदारुलमुलुकबहादूर याणी पा पालीम एथील ऐवजी तनखा केली त्याबाबत ऐवज येणे त्याचे करारनामे तुह्मी लेहून दिल्हे त्यापो नगदी आठ हजार रुो राजश्री कृष्णाजी शेषाद्रि यांजसमागमे पा ते पावले माहली मामलेदाराकडे ऐवज चौदा हजार च्यारसें सवा एकतीस रुो याच्या रसीदाच्या नकला काजीचे मोहरेनसी पाठविल्या ह्या ध्यानास आणून मजुरा द्यावा ह्मणोन लिा त्यास काजीचे मोहरेनसी रसीदाच्या नकला पाहिल्या त्यास बाबतीबा वसूल चौतीसें नऊ रुो चौदा आणे सन ११९९ बाबत व सन ११९८ सालचे बाबती पो साडेतेरासें को कृष्णराव भिवाजी यांचे मामलत ऐवजी एकूण दोन रकमाविषई पुण्याहून राजश्री गोविंदराव यांचे पत्र इकडे पाठवावें त्याप्रा समजोन याचें उत्तर लिहिण्यांत येईल बाकी रसीदा कादाराच्या मोहरेनसी असल एथें वो उपेंद्रभट यांजबा एक हजार रुपयांची बरात गोविंदराव यांची व त्यांचे कबजासुधा एकंदर पाठवाव्या ह्मणजे रसीदाअन्वयें सदरहू ऐवज मजुरा देण्याचें ठरावात येईल रा छ १८ साबान सलास तिसईन सन फसली १२०२ बहुत काय लिा लोभ कीजे हे विनंति.