Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
मीर आलम यांणीं मागितलें. लेखांक १७. १७१४ मार्गशीर्ष शुद्ध ३.
राजेश्री राजे व्यंकटपा नाहक बळवंत बहेरी
बहादूर यांस पत्र छ २ राखर.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी बहादूर मुतहवरुदौला राबेजंग गोसावी यांसि-
सकल-गुणालंकरण-अखंडित-लक्षुमि-अलंकृत राजमान्य स्रो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लिहित असणें विशेष मीर अलम बहादूर यांणीं वर्तमान सांगितलें कीं मौजे मीरचेल वगैरे देहात पा रायचूर येथील येक असामी धरून नेऊन त्याजपासोन नख्त साडेतीनसें ३५० रुपये घेऊन वे मवेसी वगैरे गुरे सततीस रास दोन तीन वेळा राजे बहेरी बहादूर याजकडील लोकांनीं घेऊन गेले आहेत ह्मणून आमचे आमीलाचें पत्र आलें त्यास आपण पहिलें पत्र लिहिलें असतां त्या प्रो अमलांत आलें नाहीं सांप्रत पत्र लेहून द्यावें त्याजवरून हें पत्र लिहिलें असे कीं सर्व दृष्ट मीर मजकूर याजवर आहे आपल्याकडील लोकाकडून हरकत जाली असेल त्यास याजकडील साडेतीनसे रुो असामी ब॥ व सततीस गुरें नेली आहेत ते असामीस देऊन त्याची रसीद घेऊन पाठवावी व पुढें यांचे जागीरीस उपद्रव न होय तें करावें र॥ छ २ राखर बहुत काय लिहिणें लोभ कीजे विनंति.