Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी इममाखां यांस पत्र महादेव लेखांक १२२. १७१४ माघ शुद्ध ७.
बावा गोसावी समंधे.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बहादूर सलामत
अज दीलएखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैरआफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून वो महादेवबावा गोसावी संस्थान वडगांव यांजकडे श्रीमंताचे सरकारातून मौजे बेतगी पा चिटगोपें एथील मोकासा–बाबती-सावोत्र्याचा अमल पेशजीपासोन बहुत दिवस आहे त्यास अकडे मौजे मारचा अमल आकाराबमोजीब पावत नाही व सनवात बाकी मागील येणे त्याचा फडच्या होत नाही व च्याहरूम तहकूफ ठेवण्याची दिकत होती कडबा व पोटगी कारकुनी आंबआंबळी सुरळीत पावत नाही। ह्मणोन सरकारांत बोभाट गेला त्यावरून येविषी सरकारची पत्रें आह्मास आली त्यास येविषी मेहरबान अजमलमुलुकबाहादूर यांचे बोलणे आपल्यासी रुबरू जालेंच आहे व पत्रहि त्यांचे घेऊन पा आहे त्यास मौजे मारचा अमल पेशजी चालत आल्याबमोजीब दरसाल बेदिकत फडच्या करीत जावा जुनारदार यांजकडील गावचें च्याहरूम तहकूफ न ठेवावे ऐसा करार आहे याजकरितां च्याहरूम तहकूफची हरकत होऊ नये सनवात बाकीचा फैसला करून देवावा कडबा वगैरे पेशजीपासोन चालत आल्याप्रा चालवावें येविषीचा बोभाट येऊ न द्यावा रा छ ५ जाखर ज्यादा काय लिहिणे.