Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

महादेव बावा गोसावी वडगांवकर                                                 लेखांक १२.                                                      १७१४ माघ शुद्ध ७.
यांचे पत्राचें उत्तर.

हरिभक्तिपरायण राजमान्य राजश्री माहादेवबावा संस्थान वडगांव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष आपण पत्र पाठविलें ते पावलें श्रीचे अन्नसत्राचे बेगमीस स्वराज्याकडून मौजे बेतगी पा चिटगोपें ही गांव व मौजे चिंचोली तपसे पा अवसे एथील मोकासाबाबती व सावोत्रा इनाम पूर्वीपासोन चालत असतां अलीकडे जागीरदार आकाराप्रा देत नाहीत व च्याहरम वजा करितात त्यास ताकीद होऊन अमल यथास्थित पोंहचावा व सनवात बाकी राहिली ते देवावी ह्मणोन विस्तारें लिहिलें त्यावरून हा मार जागीरदार यांसी बोलण्यात येऊन सिदी इमामखान अमील पा चिटगोपें यांजला समक्ष ताकिद जाली व ताकीदपत्रहि निखालस घेऊन पा आहे बेतगी एथील स्वराज्याचा अमल पेशजी कैलासवासी रावसाहेब यांचे कारकीर्दीस चालत होता त्याप्रा देत जावा च्याहरम न घ्यावें ऐसें बोलण्यांत आले त्याप्रा वहिवाट करावी सनवात बाकी मौजेमाराकडे वाजबी असेल ते जमीदाराचे रुजूने तहकीक करून फडच्या करून देण्याविसी ताकीदीत लिहिलें आहे याप्रा ठराऊन रुबरू ताकीद जाली व ताकीदपत्र इसबबेग आपणाकडून आला याजबराबर पा आहे पावेली चिंचोळी तपसे एथील स्वराज्याचा अमल राजश्री खंडो शंकर यांजकडे सुदामतप्रा च्याहरम वजा न होतां सालाबाद फडच्या होत आहे. सबब मौजेमाराची ताकीद घेण्याचें प्रयोजन नाही संस्थानचे कार्यास इकडून सहसा अनमान व्हावयाचा नाही रा छ ५ जाखर बहुत काय लिा लोभ असो द्यावा हे विनंति.