Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

भीवराव श्रीपत वकील करनूळकर                                                लेखांक ११७.                                                         १७१४ माघ शुद्ध ७.
याचे पत्राचे उत्तर छ ५ जाखर.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जावें विशेष तुह्मी पत्रें छ १५ जावलची पा ते छ २६ माहे मारी पोंहचून लिहिल्याप्रा मार समजला राजश्री बाळाजी व्यंकटेश छ ११ रोजी करनुळास येऊन अलफखानबाहादूर यांची भेट जाली दौलतीचा बंदोबस्त करण्याचा अभिमान आपल्यास येविषी घरोब्याचे बोलणे बोले मुस्तफाखान सर्व सांगतील ऐवज पावता करून बाळाजीपंताची रवानगी लौकर करितात ह्मणोन तपसिले लिहिलें ते समजले त्यास नवाब-रणमस्तखानबाहादूर मरहूम यांसी दोस्ती व घरोबा पहिलेंपासोन इकडील क़सा व कोणे प्रकारचा होता हे कांहीं लोपलें नाही अलफखान बाहादूर याजला व तुह्मास सर्व माहितच आहे त्यापक्षीं इकडोन विस्तारें ल्याहावे असे नाही त्याचे मागे संस्थानचा बंदोबस्त यथास्थित रीतीने नीट मार्गे असावा हेच इकडील ख्वाहष संस्थानसमंधे साहित्य व दौलतख्वाहीविषी इकडून पूर्वीं अनमान जाला नाही व पुढेंहि व्हावयाचा नाही मुस्तफाखान एथे आल्यास बहुत दिवस जाले अद्याप इकडे येऊन वर्तमान समजलें नाही गोपाळराव येतात त्यासी बोलण्यात येते मारनिलें लिहित असतील ऐवजास किती दिवस जालें तुमचे लिहिण्यांत वरचेवर की ऐवज आतां रवाना करितो परंतु येत नाही ऐसी चाल असो नये या उपरि व्याजसुधां ऐवजाच्या हुंड्या मय हुंडावन बाळाजी व्यंकटेश याजबार देऊन मारनिलेस लौकर पाठवावें येविसी दिवसगत लागो नये इकडील ऐवजाची कळकळ तुह्मी वागऊन मागेच ऐवज रवाना करावा तें न केलें आतां तरी अलफखानबाहादूर यांसी बोलून ऐवज लिहिल्याप्रो पत्र पावतांच हुंड्या देऊन बाळाजीपंतास आधी रवाना करावें ऐवजाची निकड जाणून लिहिले असें आलसा खाले व विलंबावर न टाकितां निकडीने एथें ऐवज पोहचे ऐसे करावें वरचेवर तिकडील वर्तमान लेहून पाठवीत जावें अलीकडे तुमचे पत्र छ २३ जावलचे एथील जासुदाबार आले ते छ २ जाखरी पावलें त्यांत अलफखान नंदपाळास गेले समागमे तुह्मी व बाळाजी व्यंकटेश गेला ऐवज लोकाकडे येणे तो वसूल करून पाठवितों खोजी चांगलमरीस गेले आहेत नवाब मरहूम यानी ऐवज दिल्हा होता तो याणी घेतला रुो पावते करितों ह्मणतात ह्मणोन लिा त्यास नवाब मरहूम याणी ऐवज तुह्मापासीं दिल्हा तुह्मी वरचेवर इकडे लिहित आला कीं पैका मजपासी जमा आहे कोणी पाठऊन न्यावा त्यावरून बाळाजी व्यंकटेश यांस पाहाली याप्रो लिहितां अपूर्व आहे याचे उत्तर काय ल्याहावें क्षणात एक क्षणात दुसरें ऐसे लिहिणें लिहितां हे चाल तुमची असो नये या उपरि टाळाटाळीचा अर्थ न करितां झाडून ऐवज व्याजसुद्धा देऊन बाळाजी व्यंकटेश यांस रवाना करावें रा छ ५ जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.