Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
तिमाराव देशपांडे वसमतकर यास लेखांक १०८. १७१४ माघ शुद्ध ५.
पत्र मुजरद जासुदाबराबर व्यंकटीदास
याचे गुमास्त्यासमागमे रवाना.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव देशपांडे पा वसमत स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून खकीये लिहीत जावे विशेष श्रीमंताचे सरकारचा ऐवज नवाब बंदगानअली यांचे सरकारातून येणे त्याऐवजी चाळीस हजार रुपयाची तनखा सैदमुजवरखान यांजवर पा मारचे ऐवजी जाली त्याचे वायद्याचा करार माहे रावल अखेर वीस हजार व अखेर माहे साबान बीस हजार यात्रा दोन मुदतीने चाळीस हजाराचा फैसला करून देण्याचा करार खानमार व राजश्री बाजीराव अमील पा मार याणी करून करारनामा लेहून दिल्हा त्यास माहे रावल अखेरचा वीस हजाराचा वायदा गुजरून अधिक दिवस जाले ऐवजाकरितां खानमार व बाजीराव उभयतांस तगादा केला मारनिलेचे बोलणें की माहाली वीस हजार रुपये जमा आहेत कोणी आपल्याकडील पाठऊन ऐवज घ्यावा त्यावरून एथून हरकिसनदास साहुकार व्यंकटीदास भुकणदासाकडील पाठविला आहे खानमार व बाजीराव उभयतानी तुमचे नांवें पत्रें वीस हजार रुपये नांदेडी हरकिसनदास याजपासी पोंहचाऊन देऊन रसीद व कबज घेण्याविषई ता लिहिलें आहे त्यास पत्र पावतांच वीस हजार रुपये हैदराबाद चलनी नांदेड एथें हरकिसनदास याजपासी पोंहचाऊन देऊन त्याजपासोन रसीद आमची मोहरेनसी व कबज घ्यावें ऐवजाचा वायदा होऊन फार दिवस जाले याउपरि लिहिल्याप्रा बेदिकत ऐवज पोंहचाऊन द्यावा यास दिवसगत लागो नये हरकिसनदास अथवा राजाराम दोघातून एक नांदेडी येतील त्यांचे पदरी सदरहू वीस हजार रुपये घालून रसीद व कबज घ्यावी दिकत न करितां राजाराम साहुकार याजला नांदेडी ऐवज पावता करून द्यावा रा छ ३ जाखर बहुत काय लिो लोभ कीजे हे विनंति.