Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजे व्यंकटपा नाईक यांचे नावें लेखांक १०६. १७१४ माघ शुद्ध ३.
पत्र अजमुलउमरा बाहादूर याणी
लेहून आह्मास पत्र ल्याहावयाकरिता
रुका व आपले पत्राचा मसोदा पा
तो पारसी जुजांत लिहिला आहे
एथून आह्मी पत्र एणेप्रा बेहरी
बाहादूर यांस लिहिले आणि आनंदराव
सभापंत यांचे हवाली केलें रा छ २
जाखर सन १२०२ फसली.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरीबाहादुर मुतहवरुदौला रोबजंग बहरुलमुल्क गोसावि यांसि-
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित असिलें पाहिजे विशेष हजुरांत अखबार गुजरली कीं तुमची कांहीं जमयेत स्वार व प्यादे सुरापुराहून तालुके प्यादली एथें कृष्णापा नाईक यांजपासी गेली व नाईकमार कोण्ही एक जमीदार याचे हिमायतीत बसोन सरकारअलीचे तालुक्यांत हांगामा करितात व तालुके ताडपत्री एथील पेंठ मारून लाखोची मालीयेत लुटून नेली त्यास हे गोष्ट करणे दानाई व दूरंदेशीपासोन दूर आहे हे आखबार हाजरतीनी वाचून ईर्षा केला कीं तुमचा वास्ता दरम्यान आहे याजकरितां शामूल जाला नाहीं तरी याचा तदारूक करणे लाजम आहे तुह्मी वारंवार नाईक बळवंत बहेरीबाहादूर यांचे एकनिष्ठपणाची व दूरंदेशीची अर्ज करितां आणि त्याची चाल या रितीची त्याजवरून आह्मी व नवाब अजमुलउमराबाहादुर याणी हुजूर अर्ज केला कीं आह्मी पत्र लिहिल्याचा इर्षाद जबान मुबारकेने आला कीं मुख्य ख्वाही करून लिहितील मी एकनिष्ठ आहे मजकडोन अंतर पडले नाहीं त्यास हे गोष्ट आह्मी ऐकणार नाहीं मगर याचे खरेपण तेव्हाच की कृष्णापा नाईक यांस तिघा भावासुद्धां बहेरी याणी आपल्याजवळ बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं तुह्मी हुजूर अर्ज कराल त्याप्रो पिजिरा होईल मगर त्याचे राहणे प्यादली तालुक्यांत न व्हावें तरीच बहेरीबाहादूर यांची दौलतख्वाही व निखालसता हुजुरांत जाहेर होईल नाही तर तदारुक आमलांत येईल याप्रो मर्जी खपा होऊन फर्माविलें त्याजवरून बाहादूर मवसूफ याणी पत्र लिहिलें आहे ऐसियास तुह्माविसी आह्मी हुजुरांत बारहा अर्ज मारून करितों की राजे बहेरीबाहादूर हाजरतीचे कदमाखेरीज दुसरा अर्थ जाणत नाहीत असे अस्ता आपल्याकडोन अशा वर्तणुकी घडतात यास काय ह्मणावें त्यास याउपरि कुष्णापा नाईक यांस त्याचे भावासुद्धा आपल्याजवळ बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं तुह्मी अर्जी करावी आह्मी व बाहादूर मवसूफ मिळोन त्यांचे योगक्षेमाविसी अर्ज करून नेमून देविले जाईल प्रस्तुत अशा चालीवरून आमचे वास्तेकरीस हाजुरांतून शब्द ठेविला त्यास याउपरि नाईकमजकूर यांस बोलाऊन घ्यावें यांत दौलतख्वाही जाहेरीत येईल नाही तरी गोष्ट कठीण पडेल सदरहू लिहिल्याअन्वये पुर्ता विचार मनांत आणून बहुत दूरंदेशीकडे दृष्ट देऊन कृष्णापा नाईक यांस त्याचे भावीसुद्धा आपलेपासीं बोलावून घ्यावे त्याचे योगक्षेमाविसीं हाजुरांत अर्ज करून बंदोबस्त करून देविला जाईल ह्मणोन अजमुलउमराबाहादूर आह्मांसी बोलिले आहेत व तुह्मासहि नवाबमवसूफ याणी पत्र लिहिले आहे तरी त्याप्रा अमलांत यावे यांतच चांगले रा छ २ माहे जाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.