Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
सिदी इमामखां यांस पार आबजलपूर लेखांक ११२. १७१४ माघ शुद्ध ५.
सरामुखी विषी पत्र खांसाहेब
मेहरबान दोस्तां सिदी इमामखां बाहादूर.
अजदिलएखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर आफीयत जाणून आपली खैरखुषी कलमी करावी दिगर मजमून पा आबजलपूर एथील सरामुखीची मामलत केशवराव हरिकडे आहे त्यास सन १२०१ ची बाकी पा मजकुराकडे राहिली आहे त्याचा फडच्या करून देण्याविषी मेहरबान अजमलमुलूक बाहादूर यांचें खत आबूतुराबखान यांचे नावें पाठविलें आहे तरी बाकीचा फडच्या करून देऊन सन १२०२ सालचे मामलतीचा फैसला मारनिलेकडे करून द्यावा दिवसगत लागो नये दिगर गांवसुधा बाकी सालमारिचा इनफिसाल करून द्यावा बोभाट न ये तें करावें रा छ ३ जाखर ज्यादा काय लिहिणे.