मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

बाजीराव यांचे पत्र.                                                                     लेखांक १११.                                                         १७१४ पौष वद्य ८.

श्रीमंत राजश्री रावजी स्वामीचे सेवेसी-

सेवक बाजीराव शेषाद्रि व त्रिंबक भुलाजी सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल छ २१ माहे जावल मुा शहर हैदराबाद जाणोन तुह्मी आपलें क्षेम लिहीत असावें विशेष श्रीमंत राव गोविंदराव कृष्ण यांची तनखा सरकारांतून चाळीस हजार रुपयाची पेशजी जाहली त्याचे नवाजषनामे दोन अखेर रावलचे वायदा विसा हजाराचा व अखेर शाबान विसा हजाराचा या दो वायद्यापो अखेर रावलचा वायदा गुजरून गेला एथें त्यानी ऐवजाकरितां निकड लाविली याजवरून आपणास लिो जाते जे राव गोविंद कृष्ण यांचे मोहेरनसी रसीद विसा हजार रुपयाची व हें पत्र व. भुकणदास व्यंकटीदास साहूकार याचा गुमास्ता हे दोन्ही दस्तऐवज घेऊन आपणापासी येतील ते दोन्ही दस्तऐवज घेऊन ऐवज त्याचे पदरी घालून साहुकाराचे गुमास्त्याचें कबज घ्यावें नवाजषनामा वायदयाचा श्रीमंत रा गोविंदराव मामा पुण्यास गेले त्यांचेबराबर गेला सबब मुजरद हरकारा नवाजषनामा आणावयास पा असे तोहि आठ चऊं रोजानी येईल आणि चाळीस हजार रुपयाचा तमसुक लिहून दिल्हा त्याजवर वसूल मांडून घेऊ ऐवज देण्यास दिकत हरगीज न करावी दुसरें साहुकाराचा गुमास्ता वसमतीस येणार नाही गोपाळ ना सराफा बराबर सदरहू रुपये नांदेडी पाठऊन साहेब मोहीदीन यांचे मारफातीने देऊन कबज रसीद घ्यावी विशेष काय लिहिणे लोभ कीजे है विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries