Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक २७४
१७०८-१७०९
श्री भैरवप्रसन्न
श्रीकरहाटकक्षेत्रस्थविद्वज्जनसमूह यानी लेहून दिल्हे निर्णयपत्र ऐसे जे भीमाजी बल्लाळ व कृष्णाजी बल्लाळ व सदाशिव बल्लाळ वास्तव्य कुमटे समत कोरेगाव प्रात वाई या त्रिवर्गा मध्ये दत्तक विषई कलह होऊन क्षेत्रमजकुरास कृष्णाजी बल्लाळ यानी येऊन विनति केली त्याज वरून भिमाजी बल्लाळ यास व सदाशिव बल्लाळ या उभयतास बोलाऊन आणून कृष्णाजी बल्लाळ याचा कज्या बा। पुरसीस केली त्यास त्याणी पचाईतमुखे न्याय होईल त्याज प्रो। मान्य असो म्हणोन विनति केली त्याज वरून त्रिवर्ग राजी होऊन राजीनामे लेहून दिल्हे बि॥
भिमाजी बल्लाळ १ कृष्णाजी बल्लाळ १
सदाशिव बल्लाळ १ लग ०
या प्रो। राजीनामे घेऊन त्रिवर्गास जामीन पचाईतमुखे न्याय होईल त्याज प्रो । वर्तावयास जामीन आणावयास आज्ञा केली त्याज वरून जामीनकतबे बि।।
१ भिमाजी बल्लाळ यास जामीन १ कृष्णाजी बल्लाळ मौजे वाडे
मौजे सैदापूर
१ सदाशिव बल्लाळ मौजे उपलवे
या प्रमाणे राजीनामे व जामीनकतबे घेऊन त्रिवर्ग वादे यास तकरीरा करीणे लेहून द्यावयास आज्ञा केली त्याज वरून तकरीरा करीणे लेहून दिल्हे बिता।
२ पुरवणी कलमझाड